भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीने भारताचा कर्णधार विराट कोहली हा जवळजवळ दिग्गजच आहे, या शब्दात त्याचे कौतुक केले आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात धोनी बोलत होता. तो विराटबद्दल म्हणाला, ” विराट उत्कृष्ट आहे. तो जवळजवळ दिग्गज होण्याच्या स्तरापर्यंत पोहचला आहे. मला त्याच्याबद्दल आनंद आहे.”
“तो ज्याप्रमाणे सगळीकडे फलंदाजी करत आहे आणि मागील काही वर्षांपासून त्याने संघाला उत्तमरितीने पुढे नेले आहे. अशाच गोष्टी तुम्हाला कर्णधाराकडून अपेक्षित असतात. त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. तो खूप चांगला खेळत आहे.”
विराट नुकताच आयसीसी कसोटीच्या फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे. तो असे करणारा केवळ सातवाच भारतीय फलंदाज ठरला आहे.
गोलंदाजांचेही केले कौतुक-
विराटबरोबरच धोनीने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी केलेल्या भारतीय गोलंदाजांचेही कौतुक केले आहे.
गोलंदाजीबद्दल धोनी म्हणाला, “कसोटी सामना जिंकण्यासाठी तूम्हाला 20 विकेट्स घेण्याची गरज असते आणि आपण ते केले होते. हीच गोष्ट मी सांगु शकतो. तुम्ही किती चांगली फलंदाजी केली आणि तुम्ही 5 दिवस जरी फलंदाजी केली तरीकाही फरक पडत नाही पण जर तुम्ही 20 विकेट्स घेतल्या तर तूम्ही कसोटी सामना जिंकू शकता.”
भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात इंग्लंडला दोन्ही डावात कमी धावसंख्येत सर्वबाद केले आहे. मात्र फलंदाजांपैकी विराट व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन्ही डावात मिळून 60 पेक्षा जास्त धावा करता आले नाही.
विराटने या सामन्यात दोन्ही डावात मिळून प्रत्येकी अनुक्रमे 149 आणि 51 धावा केल्या आहेत. पण बाकी फलंदाजांकडून साथ न मिळाल्याने भारताला 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–टाॅप ३- या भारतीय खेळाडूंचा २०१९चा विश्वचषक ठरणार शेवटचा!
–सचिनच्या निवृत्तीच्या भाषणानंतर भावुक झाले होते करुणानिधी
–उपकर्णधार रहाणे शेवटच्या रांगेत तर अनुष्का शर्मा पहिल्या, चाहत्यांकडून जोरदार हल्लाबोल