विराट कोहलीच्या बॅटमधून अजून एक शानदार पारी खेळताना दिसली. किंग कोहलीने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळलेल्या सामन्यात 47 चेंडूत 51 धावा केल्या. विराट कोहलीने या पारी सोबत आयपीएल 2025 च्या ऑरेंज कॅपवर वर्चस्व केले आहे. विराटने आत्तापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यात 443 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आयपीएलमध्ये तो कारनामा केला आहे जो या स्पर्धेच्या इतिहासात कोणताही फलंदाज करू शकला नाही.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये ही अकरावी संधी आहे, जेव्हा विराटने एका हंगामात 400 धावांचा आकडा पार केला आहे. कोहली या यशावर पोहोचणारा पहिला फलंदाज आहे. कोहली शिवाय आयपीएल करिअरमध्ये कोणताही फलंदाज दहा वेळा चारशे धावांचा आकडा पार करू शकला नाही. या यादीमध्ये सुरेश रैना दुसऱ्या स्थानावर त्याच्याबरोबरच शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर सुद्धा आहेत. ज्यांनी त्यांच्या आयपीएल करिअरमध्ये 9 वेळा एका हंगामात 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने या स्पर्धेमध्ये हा कारनामा 8 वेळा केला आहे. विराट आयपीएल 2025 मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत 6 अर्धशतके झळकावली आहेत.
विराट कोहलीने अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल विरुद्ध खेळलेल्या सामन्यात 51 धावांची अर्धशतकी पारी खेळली. त्याने यादरम्यान चार चौकार झळकावले. विराटने कृणाल पांड्यासोबत मिळून चौथी विकेट पडण्याआधी 119 धावा केल्या. तेव्हा आरसीबीने फक्त 26 धावांवर 3 खेळाडू गमावले होते. कृणाल पंड्याने 47 चेंडू 73 धावांची तुफानी पारी खेळली. त्याने नऊ वर्षानंतर या स्पर्धेत अर्धशतक झळकावले आहे. आरसीबीने सातवा विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने पाऊले टाकली आहेत.