रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहली याने आयपीएल २०१६ च्या अंतिम सामन्यातील पराभवाबद्दल आठवण काढत निराशा व्यक्त केली. बेंगलोरमध्ये झालेल्या या सामन्याची सुरुवात चांगली झाली असली, तरीही सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धचा हा सामना आरसीबीने आठ धावांनी हरला होता.
त्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकांत ७ गडी गमावत २०८ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि ख्रिस गेल या फॉर्ममध्ये असलेल्या सलामीच्या जोडीने बेंगळुरू संघाला अवघ्या नऊ षटकांत 100 चा टप्पा पार करून दिला. मात्र, अखेरच्या ९.३ षटकांत संघाला ८० धावातच सर्वबाद व्हावे लागले होते.
कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने लीग टप्प्यातील शेवटचे चार सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्या हंगामात कोहलीने १६ सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती. त्याने त्या आयपीएलमध्ये १५२.०३ च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटच्या मदतीने सर्वाधिक ९७३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ शतके आणि ७ अर्धशतके झळकावली होती.
आरसीबी पॉडकास्टवर बोलताना कोहली म्हणाला, “फायनल, मला असे वाटते की, जसं लिहिले होते, की बेंगलोरमध्ये फायनल कशी असू शकते? जेव्हा आम्ही अशा प्रकारचा हंगाम खेळतो आणि आम्ही ९ षटकांनंतर सुद्धा १००-० असे खेळत होतो. आजपर्यंत, केएल राहुल जेव्हा सामना पाहातो, तेव्हा तो स्क्रीनशॉट घेतो आणि तो पराभव अजूनही टोचतो .”
पुढे कोहली म्हणाला, “एका मर्यादेपर्यंत दुखावते. तुम्हाला खेळाचा सतत विचार करावा लागतो. त्या दिवशी आम्ही फारसे चांगले नाही खेळू शकलो. हा असा सामना आहे, जिथे मला वाटतं, दुख: होतं.”
साल २०१६ च्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल बोलताना कोहली म्हणाला, “२०१६ मध्ये केएल राहुलच्या करिअरचा ग्राफ बदलला आणि तो याबाबतीत माझ्याशी सहमत आहे. तो हंगाम साहजिकच छान होता, चार खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली, टी२० क्रिकेटमध्ये असे फारच कमी पाहायला मिळालं आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
Video : …आणि पाकिस्तान विरुद्ध १० विकेट्स घेणाऱ्या अनिल कुंबळेचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले
जेव्हा भारताने चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवलेला कसोटी इतिहासातील पहिला विजय, वाचा सविस्तर
२०२२ मध्ये रोहित पर्व! नेतृत्व हाती घेताच मिळवून दिला वर्षातील पहिला विजय