इंग्लंड विरुद्ध भारत संघातील 3 सामन्यांची वनडे मालिका मंगळवारी (17 जुलै) पार पडली. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (18 जुलै) वनडे क्रमवारी जाहिर केली आहे.
यात फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने अव्वल स्थान अबाधित राखताना वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च गुण मिळवले आहेत. त्याचे आता वनडे क्रमवारीत 911 गुण झाले आहेत. त्यामुळे तो सर्वकालीन वनडे क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आला आहे.
सर्वकालीन वनडे फलंदाजी क्रमवारीत त्याने पाकिस्तानच्या जावेद मियाँदादच्या 910 गुणांना मागे टाकले आहे. या यादीत विंडीजचे महान फलंदाज सर विवियन रिचर्डस् 935 गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. तसेच तो या यादीत पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
विराटने इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील तीन सामन्यात अनुक्रमे 75, 45 आणि 71 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने 2 गुणांची कमाई केली.
तसेच याआधी फेब्रुवारी 2018 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर 909 गुण मिळवले होते. त्यावेळी त्याने ब्रायन लारा यांच्या 908 गुणांच्या विक्रमला मागे टाकले होते. त्याचबरोबर तो सर्वकालीन वनडे फलंदाजी क्रमवारीत 900 पेक्षा जास्त गुण मिळवणारा पहिलाच भारतीय खेळाडूही ठरला होता.
टॉप 10 खेळाडूंचे सार्वकालीन वनडे गुण
935 सर विवियन रिचर्ड्स (क्रमवारी -1)
931 झहीर अब्बास (क्रमवारी -2)
921 ग्रेग चॅपल (क्रमवारी -3)
919 डेव्हिड गॉवर (क्रमवारी -4)
918 डीन जोन्स (क्रमवारी -5)
911 विराट कोहली (क्रमवारी -6)
910 जावेद मियाँदाद (क्रमवारी -7)
908 ब्रायन लारा (क्रमवारी -8)
902 एबी डिव्हिलियर्स (क्रमवारी -9)
901 हाशिम अमला (क्रमवारी -10)
महत्त्वाच्या बातम्या:
–युरो २०१६ त्याने प्रेक्षक म्हणून पाहिला आणि आता बनला विश्वविजेता !
–सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, इंग्लंडमध्ये सुरु केली क्रिकेट आकादमी
–केएल राहुलसाठी चाहते मैदानात, विराट कोहली आणि रवी शास्त्रींवर जोरदार टिका