आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडूंच्या नावावर अनेक मोठ-मोठे रेकाॅर्ड आहेत. तत्पूर्वी भारतीय खेळाडू रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर एक असा रेकाॅर्ड आहे, जो जगातील क्वचितच कोणताही फलंदाज मोडू शकेल. सध्या रोहितचा हा रेकाॅर्ड मोडणे विराट कोहली (Virat Kohli), केन विल्यमसन (Kane Williamson), स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), जो रूट (Joe Root) या 4 महान क्रिकेटपटूंना जवळपास अशक्य आहे.
भारताचा 37 वर्षीय दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्याच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला फलंदाज आहे. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. रोहितची चेंडू मारण्याची क्षमता पाहून त्याला ‘हिटमॅन’ नावाने देखील ओळखले जाते. या बातमीद्वारे आपण रोहितच्या रेकाॅर्डबद्दल जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावा (बेंगलोर)- रोहित शर्माने (Rohit Sharma) एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले होते. रोहितने 2 नोव्हेंबर 2013 रोजी बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 158 चेंडूत 209 धावांची शानदार खेळी खेळली होती. दरम्यान त्याने 12 चौकारांसह 16 षटकार ठोकले होते.
श्रीलंकेविरुद्ध 264 धावा (कोलकाता)- (13 नोव्हेंबर 2014) रोजी कोलकाता येथे श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात रोहितने 264 धावांची खेळी खेळून विश्वरेकाॅर्ड केला, जो आजपर्यंत कोणताही फलंदाज मोडू शकला नाही. रोहितचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे दुसरे द्विशतक होते आणि असे करणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला. 264 धावांच्या खेळीत रोहितने 173 चेंडूंचा सामना करत 33 चौकारांसह, 9 षटकार ठोकले होते.
श्रीलंकेविरुद्ध (मोहाली) नाबाद 208 धावा- (13 डिसेंबर 2017) रोजी श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली एकदिवसीय सामन्यात, रोहितने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे द्विशतक झळकावत 208 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 12 षटकार ठोकले होते. कर्णधार म्हणून रोहितची ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.
महत्त्वाच्या बातम्या-
महान क्रिकेटर होण्यापासून वंचित राहिला ‘हा’ खेळाडू, तरूण वयातच संपली कारकिर्द
भारतीय महिला करणार पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न, इस्लाम धर्माचाही करणार स्वीकार
सागरिका घाटगेपूर्वी या बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत होता झहीर खान, 8 वर्ष टिकलं होतं नातं