---Advertisement---

कोहलीची बॅट आज तळपली तर रेकॉर्ड्सचा वर्षाव – फक्त 5 धावांसाठी एक मोठा विक्रम

On: शुक्रवार, मार्च 28, 2025 7:27 PM
Virat Kohli 3
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघात आज 28 मार्च रोजी आयपीएल 2025 स्पर्धेतील 8 वा सामना खेळला जाणार आहे. चेन्नईच्या घरेलू मैदानावर म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेमध्ये विजय मिळवून चांगली सुरुवात केली आहे. आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पराभूत केला आहे, तर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला हरवले आहे.

आज असाच एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात विराट कोहलीवर सगळ्यांच्याच नजरा असणार आहेत. जर तो आजच्या सामन्यात चांगलं खेळला तर, तो कितीतरी रेकॉर्ड्स त्याच्या नावावर करू शकतो.

विराट कोहली टी20 मध्ये 13000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 55 धावा दूर आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 55 धावा करून तो टी20 मध्ये 13000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय बनू शकतो.

टी20 मध्ये 13000 धावा बनवणारे फलंदाज
14562 क्रिस गेल (463 सामने)
13610 एलेक्स हेल्स (494 सामने)
13537 कीरोण पोलार्ड (695 सामने)
13535 शोएब मलिक (553 सामने)
12945 विराट कोहली (400 सामने)

सीएसके विरुद्ध आज विराट कोहली सर्वात मोठा विक्रम त्याच्या नावावर करू शकतो. विराट कोहली आज फक्त 5 धावा करून चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरू शकतो. तसेच तो शिखर धवनचा रेकॉर्ड सुद्धा तोडू शकतो, सध्या शिखर धवन 1057 धावांनी या यादीमध्ये सर्वात वरच्या स्थानी आहे.

सीएसके विरुद्ध सर्वात जास्त धावा
1057 शिखर धवन (29 डाव)
1053 विराट कोहली (32 डाव)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---