प्रमोशन फेरीत मुंबई शहर मौर्य मेवरीक्स विरुद्ध कोल्हापूर ताडोबा टायगर्स यांच्यात चौथ्या दिवशी पहिली लढत झाली. दोन्ही संघांनी प्रमोशन फेरीत 2 सामने जिंकले होते तर 1 सामना गमावला होता. कोल्हापूर संघाने आक्रमक सुरुवात करत सामन्यात पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या सातव्या मिनिटाला मुंबई शहर ला ऑल आऊट कोल्हापूर संघाने आघाडी मिळवली.
मध्यंतर होण्यापूर्वी मुंबई शहर ने दोन सुपर टॅकल करत पिछाडी कमी केली. मध्यांतरला कोल्हापूर संघाकडे 23-20 अशी 3 गुणांची आघाडी होती. कोल्हापूर कडून तेजस पाटील ने सुपर टेन पूर्ण करत संघाला आघाडी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. मध्यंतरा नंतर मुंबई शहर ने आक्रमक भूमिका घेत गुण मिळवले. मुंबई शहराच्या शार्दूल पाटील व जतिन विंदे ने सुपर टेन पूर्ण करत संघाची आघाडी कमी केली.
सामन्याची पाच मिनिट शिल्लक असताना कोल्हापूर कडे 37-34 अशी आघाडी होती. त्यानंतर मुंबई शहराच्या बचावफळी ने जबरदस्त पकडी करत सामन्याला कलाटणी देत कोल्हापूर संघावर लोन पाडला. शेवटची तीन मिनिटं शिल्लक असताना मुंबई शहर कडे 39-37 अशी आघाडी आली होती. मात्र तेजस पाटील च्या चपळ चढायांनी कोल्हापूर संघाने अखेर विजय 43-41 असा विजय मिळवला. कोल्हापूर कडून तेजस पाटील ने 18 गुण मिळवले. तर दोन्ही ओमकार पाटील यांनी प्रत्येकी 8 गुण मिळवले. मुंबई शहर कडून शार्दूल पाटील ने 17 गुण तर जतिन विंदे 10 गुण मिळवत सामन्यात चुरस वाढवली मात्र त्याना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. (Kolhapur Tadoba Tigers beat Mumbai City in a head-to-head match)
बेस्ट रेडर- तेजस पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
बेस्ट डिफेंडर- रुपेश साळुंखे, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
कबड्डी का कमाल- तेजस पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तेव्हाच विराट आणि सचिनची तुलना करा…’, रिकी पाँटिंगची सर्वात मोठी प्रतिक्रिया
विराटची विकेट काढताच बोल्टचा नाद पराक्रम! IPLमध्ये आतापर्यंत ‘एवढ्या’ फलंदाजांना शून्यावर धाडलंय तंबूत