प्रमोशन फेरीतील शेवटचा व महत्वपूर्ण सामना कोल्हापूर ताडोबा टायगर्स विरुद्ध नाशिक द्वारका डिफेंडर्स यांच्यात झाला. नाशिक संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर राहणार हे निश्चित होता. मात्र कोल्हापूर संघाच्या विजयाने किंवा पराभवाने कोण दुसरा स्थान पटकावणार हे ठरणार होता. दुसऱ्या स्थान साठी कोल्हापूर व नांदेड यांच्यात स्पर्धा होती. दोन्ही संघांनी सामन्याची सुरुवात सावध केली. दहा मिनिटांतर सामना 9-9 असा बरोबरीत होता.
10 व्या मिनिटानंतर मात्र कोल्हापूर संघाने आक्रमक खेळ करत नाशिक संघाला मध्यंतरा पर्यत दोन वेळा ऑल आऊट करत सामन्यात 28-18 अशी आघाडी मिळवली. निखिल बर्गेच्या सुपर टेन ने कोल्हापूर संघाला आघाडी मिळवता आली. आदित्य पवार ने हाय फाय पूर्ण करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. मध्यांतरा नंतर दोन्ही संघ एकमेकांना चांगले टक्कर देताना दिसले.
सामन्याची शेवटची पाच मिनिट शिल्लक असताना कोल्हापूर संघाकडे 40-30 अशी आघाडी होती. त्यानंतर नाशिक संघाने चांगली टक्कर दिली मात्र अखेर कोल्हापूर संघाने 46-36 असा विजय मिळवत दुसरे स्थान सुनिश्चित केले. कोल्हापूर कडून निखिल बर्गे ने 19 गुण मिळवले. तर आदित्य पवार ने 8 पकडी करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. (Kolhapur Tadoba Tigers finished second in the promotion round)
बेस्ट रेडर- निखिल बर्गे, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
बेस्ट डिफेंडर- आदित्य पवार, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
कबड्डी का कमाल- निखिल बर्गे, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाचा चौथा विजय, दुसऱ्या स्थानाच्या शर्यतीत कायम
अखेर ठाणे हम्पी हिरोज संघाने रोखला अहमदनगर संघाचा विजयी रथ