पुणे – क्वालिफायर 4 मध्ये कोल्हापूर विरुद्ध पालघर यांच्यात लढत झाली. साहिल पाटील, सौरभ फगारे व ओमकार पाटील यांनी चढाईत गुण मिळवत कोल्हापूर संघाला 5-0 अशी जोरदार सुरुवात करून दिली. त्यानंतर पालघरच्या पियुष पाटील ने 2 गुण मिळवत संघाचा खात उघडला. तर सामन्याच्या 6 व्या मिनिटाला कोल्हापूर संघाने पालघर संघाला ऑल आऊट करत 10-03 अशी आघाडी मिळवली. कोल्हापूरच्या चढाईपटूंनी व पकडपटूंनी सांघिक खेळ करत 12 व्या मिनिटाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत 19-04 अशी आघाडी मिळवली.
कोल्हापूर कडून सौरभ फगारे ने अष्टपैलू खेळ करत गुण मिळवले. ओमकार पाटील व साहिल पाटील यांनी गुण मिळवत संघाची आघाडी मिळवून दिली. तर साईप्रसाद पाटील ने बचावफळीत गुण मिळवले. कोल्हापूर संघाने मध्यंतरापूर्वी तिसऱ्यांदा पालघर संघाला ऑल आऊट करत 31-06 अशी आघाडी मिळवली. मध्यंतरा नंतर ही कोल्हापूर संघाने आक्रमक खेळ केला. तर पालघर संघाने कोल्हापूर समोर गुडखे टेकले. सौरभ फगारे ने सुपर टेन पूर्ण व साईप्रसाद पाटील ने हाय फाय पूर्ण केला.
क्वालिफायर सामन्याची शेवटची 6 मिनिटं शिल्लक असताना कोल्हापूर संघाकडे 50-10 अशी आघाडी होती. कोल्हापूर संघाने संपूर्ण सामन्यात वर्चस्व दाखवत सामना 56-16 असा एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवला. कोल्हापूर कडून सौरभ फगारे ने चढाईत 13 तर पकडीत 3 गुण मिळवले. तर साहिल पाटील ने चढाईत 9 तर पकडीत 2 गुण मिळवला. ओमकार पाटीलने चढाईत 8 गुण प्राप्त केले. साईप्रसाद पाटील ने पकडीत 5 गुण मिळवले. दादासो पुजारी व धनंजय भोसले ने पकडीत प्रत्येकी 2 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- सौरभ फगारे, कोल्हापूर
बेस्ट डिफेंडर- साईप्रसाद पाटील, कोल्हापूर
कबड्डी का कमाल – सौरभ फगारे, कोल्हापूर