महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेअशन व देवगड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित पुरुष व महिला (निमंत्रित संघ) राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धाचा १७ ते १९ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते.
“माजी आमदार कै. आप्पासाहेब गोगटे स्मृतीचषक” या नावाने जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे तालुका देवगड यांनी यास्पर्धेचा आयोजन केल होते. काळ (१९ जानेवारी) स्पर्धाच्या शेवटच्या दिवशी पुरुष व महिला विभागाचे दोन-दोन उपांत्य सामने व अंतिम सामने झाला.
पुरुष विभागात छावा कोल्हापूर संघ विरुद्ध जयभारत मुंबई शहर यांच्यात अंतिम लढत झाली. छावा कोल्हापूर संघाने आक्रमक खेळ केला. छावा कोल्हापूर संघाने ३६-२६ असा विजय मिळवत विजेतेपद पटाकवले. त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीत छावा कोल्हापूर संघाने ३८-२६ असा विजय बजरंग संघाचा पराभव केला होता. तर जयभारत संघाने उत्कर्ष उपनगर संघावर ३०-२६ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.
महिला विभागात जय हनुमान बाचणी कोल्हापूर विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उपनगर यांच्यात अंतिम लढत झाली. जय हनुमान संघाकडून प्राजक्ता पाटील व आरती पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला. जय हनुमान बाचणी संघाने २३-१३ असा विजय मिळवत विजतेपद पटकावले.
त्याआधी झालेल्या महिलांच्या उपांत्य फेरीत जय हनुमान बाचणी संघाने ३३-१५ असा सी. एम. सिंधू संघाचा पराभव केला होता. तर स्वराज्य स्पोर्ट्स उपनगर ने अंकुर स्पोर्ट्स मुंबईचा ३६-१२ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
पुरुष विभाग निकाल:-
अंतिम विजेते- छावा, कोल्हापूर
अंतिम उपविजेते- जयभारत, मुंबई
उपांत्य उपविजयी- विजय बजरंग, मुंबई
उपांत्य उपविजयी- उत्कर्ष, उपनगर
शिस्तबद्ध संघ- सिंधूपुत्र, कोलोशी
उत्कृष्ट पकड- रोहित माने (कोल्हापूर)
उत्कृष्ट चढाई- सिद्धेश सावंत (जयभारत)
अष्टपैलू खेळाडू- ऋषिकेश गावडे (कोल्हापूर)
महिला विभाग निकाल:-
अंतिम विजेते- जय हनुमान बाचणी, कोल्हापूर
अंतिम उपविजेते- स्वराज्य स्पोर्ट्स, उपनगर
उपांत्य उपविजयी- सी. एम. सिंधू, सिंधुदुर्ग
उपांत्य उपविजयी- अंकुर, मुंबई
शिस्तबद्ध संघ- हौलीक्रॉस, सावंतवाडी
उत्कृष्ट पकड- प्राजक्ता पाटील (कोल्हापूर)
उत्कृष्ट चढाई- अंजली रोकडे (स्वराज)
अष्टपैलू खेळाडू- आरती पाटील (कोल्हापूर)