कोल्हापूर मुली संघाने महापौर चषक जिल्हा स्तरीय साॅफ्टबाॅल अंतीम मुलींच्या गटात पुणे जिल्हा संघावर 5-0 ने मात करून खिलाडू वृत्तीने गतवर्षीच्या अंतीम सामन्यातील पराभवाची परतफेड केली. या अटी तटीच्या झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघा कडून ऐश्वर्या पूरी हिने दोन तर सुषमिता पाटील, स्वप्नाली वायदंडे व स्नेहल जाधव यांनी प्रत्येकी एक होमरन केला. कोल्हापूर संघातील स्वप्नालीच्या सुपर फास्ट महाराष्ट्र एक्सप्रेस पिचिंग पुढे पुणे जिल्हा संघाला एकही होमरन करता आला नाही.
एस. पी काॅलेजच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत अंतीम मुलाच्या गटात कोल्हापूर संघानेच अहमदनगर संघावर 5-0 ने एकतर्फी मात केली. कोल्हापूर संघाकडून ऋतीक फाटे, निखिल लाटकर, ऋतीक ओबासे, असपाक शिकलगार, ऋषीकेश माने यांनी प्रत्येकी एक होमरन केला.
तत्पूर्वी झालेल्या सेमी फायनल मध्ये मुलीच्या गटात कोल्हापूर संघाने बारामती संघावर 2-0 ने मात केली. कोल्हापूर संघातील ऐश्वर्या पुरी व स्नेहल जाधव यांनी प्रत्येकी एक होमरन केला.
तसेच अत्यंत चुरशीच्या झालेल्या सेमी फायनल मुलीच्या गटात पुणे जिल्हा संघाने पुणे शहर संघावर7-5 ने मात केली. यापैकी पुणे जिल्हा संघातील पूर्वा चव्हाण हिने दोन तर आयेशा बोडक, प्रतिभा अरगडे, शुभदा जगदाळे व अलीझा शेख यांनी प्रत्येकी एक होमरन केला. तसेच पुणे शहर संघातील मोहीनी गरड, मोनाली नातू, हर्षदा कासार व आरती भालेराव यांनी प्रत्येकी एक होमरन केला
मुलांच्या गटात सेमी फायनलला कोल्हापूर संघाने सांगली संघावर 10-0 ने सहज विजय मिळवला. कोल्हापूर संघातील ऋतीक फाटे,निखिल लाटकर, ऋतीक ओबासे यांनी प्रत्येकी दोन तर आशपाक शिकलगार, स्वप्निल गदादे, ऋषींकेश माने, आकाश कदम यांनी प्रत्येकी एक होमरन केला केला
त्यानंतर मुलाच्या झालेल्या सेमीफायल सामन्यात अहमदनगर संघाने मुंबई संघावर 9-5 नी मात करून विजयी झाले. अहमदनगर संघातील पवन ने 3, प्रतीक गाडेकरने 2, संजय ठाकूर, अजिज शेख व भूषण पेंडभाजे यांनी प्रत्येकी एक होमरन केला.
महापौर चषक जिल्हास्तरीय साॅफ्टबाॅल स्पर्धेचा समारोप एस. पी. काॅलेज पुणेच्या मैदानावर दि. 25 डिसेंबर 2018 सायंकाळी 9 वा. मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आदरणीय महापौर मा.सौ. मुक्ता टिळक, व उपायुक्त ( क्रीडा) कीशोरी शिंदे मॅडम यांचे हस्ते पार पडला. यावेळी मा. महापौर यांनी आपले मनोगतव्यक्त करताना पुणे महानगरपालिका ही खेळाडूना नेहमीच प्राधान्य देत असते.
याचाच एक भाग म्हणून यावर्षी देशी,विदेशी, मैदानी व मातीतील एकूण मागील 12 ऐवजी 28 खेळाचे महापौर चषक राज्य व जिल्हा स्तरावरच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या झालेल्या महापौर साॅफ्टबाॅल चषक स्पर्धेत बरेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू सहभागी आहेत. त्यापैकी एक जरी खेळाडू सन 2020 मध्ये टोकियो येथे होणा-या ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या साॅफ्टबाॅल खेळात सहभागी झाला तर पुणे महानगर पालिकेच्या शिरपेषात मानाचा तुरा रोवला जाईल याकरिता महानगरपालिका ही पुणे शहर साॅफ्टबाॅल असोसिएशनला सर्वोतोपरी सहकार्य करेल असे अवाहन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्या मृदुला महाजन यांनी, पुरस्कार वाचन विक्रम फाले सर तर अभार प्रदर्शन सुभाष मुळे यांनी केले. यावेळी महापौर चषकच्या संयोजकां सौ. सरस्वती शेंडगे, पुणे शहर साॅफ्टबाॅल असोसिएशनचे सचिव अतुल शिंदे, सहसचिव ऐश्वर्या साठे , नाना शिंदे प्राचार्या सुनिता फडके, मा नगरसेविक शेंडगे, अशिष शिंदे, सुनिल भालेराव, राजू मुरकुटे,सौ. दिपीका कांबळे, सौ. राजश्री मुरकुटे, लक्ष्मण राठोड, शोभा मुळे व सर्व पदाधिकारी तसेच क्रीडा विभागातील अधिकारी, व सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.