भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर कोलकाता उच्च न्यायालयाने आर्थिक दंड ठोठावला आहे. गांगुली यांच्यासोबतच न्यायालयाने बंगाल सरकार आणि गृहनिर्माण महामंडळावरही दंड ठोठावला आहे. चुकीच्या पद्धतीने जमीन वाटपाच्या प्रकरणात न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
सौरव गांगुली यांना १० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच बंगाल सरकार आणि गृहनिर्माण महामंडळ या दोन्हींना ५०-५० हजार रुपयांचा दंड केला आहे. हा दंड भरण्यासाठी न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांची मुदत दिली आहे. गांगुली यांना ज्या जमीनीच्या बाबतीत हा दंड केला गेला आहे, त्याठिकाणी त्यांचे शाळा बांधण्याचे नियोजन आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती अरिजित बनर्जी यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली आहे. खंडपीठाने सांगितले की, जमीन वाटपाबाबत निश्चित नियम पाहिजेत, जेणेकरून अशाप्रकारच्या प्रकारणांमध्ये हस्तक्षेप होऊ नये.
याचिकेत दोन एकर जागेविषयी उपस्थित केले होते प्रश्न
सौरव गांगुली यांच्या शिक्षण संस्थेसाठी कोलकाता सरकारने कोलकातामध्ये न्यू टाऊन याठिकाणी जागा दिली होती. कोलकाता सरकारने ही जागा देताना नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. न्यायालयाकडे केले गेलेल्या याचिकेमध्ये भारतीय क्रिकेट सौरव गांगुली यांच्या एजुकेशन ऑन्ड वेलफेअर सोसायटीच्या शाळेसाठी दिल्या गेलेल्या दोन एकर जागेविषयी प्रश्न उपस्थित केले गेले होते.
गांगुली यांनी कायद्याप्रमाणे काम करायला हवे होते
सौरव गांगुली आणि त्यांच्या शिक्षण संस्थेवर लावल्या गेलेल्या १०,००० रुपयांच्या दंडाविषीय खंडपीठाने सांगितले की, त्यांनी कायद्याप्रमाणे काम करायला हवे होते, विशेषत: यापूर्वी दिलेल्या निर्णयाचा विचार करून, ज्यामध्ये त्यांच्या भूखंडाचे केलेले मनमानी वाटप रद्द केले गेले होते.
संविधानापुढे सर्व समान
खंडपीठाने पुढे सांगितले की, देश नेहमीच खेळाडूंसोबत उभा असतो. विशेषत: जे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करतात. हे बरोबर आहे की, गांगुली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाचे नाव रोशन केले, पण जेव्हा गोष्ट नियम आणि कायद्याची येते तेव्हा संविधानासमोर सर्व समान आहेत. त्यापेक्षा कोणी मोठे असू शकत नाही.
या जमीन प्रकरणाविषयी २०१६ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
आधीच संधी मिळत नसलेल्या कुलदीपच्या वाढल्या अडचणी, आयपीएलसह ‘या’ स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता
‘मला त्याची पाकिस्तानातच बेईज्जती करायची होती’, कैफने सांगितलं कशी केली अख्तरची फजिती?
वॉर्नर तुस्सी ग्रेट हो! ज्या खेळाडूमुळे गेले संघातील स्थान, त्याचीच थोपटली पाठ; बघा व्हिडिओ