मुंबई । 2020 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोना या विषाणूने संपूर्ण जगाला त्रस्त केले. त्याचा मुकाबला करता करता अनेकांना नाकी नऊ आले. कोरोनाचा सामना करत असतानाच आता नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. बंगाल आणि ओडिशासारख्या राज्यात अम्फान वादळाने धुमाकूळ घातला. तर महाराष्ट्राला निसर्ग वादळाचा तडाखा बसला. दोन्ही वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासोबतच आर्थिक नुकसानही सोसावे लागत आहे.
अशा नैसर्गिक संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी सरकार आपले प्रयत्न करत असले तरी सरकारची मदत सर्व ठिकाणी पोहोचत नाही. ती कसर भरून करण्याचे काम सामाजिक संस्था आणि संघटना करत आहेत. सामाजिक भान राखत आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना मदतीचा हात देत आहेत.
यादरम्यान, आयपीएलमधील फ्रेंचायजी केकेआरची टीम देखील कोलकातामध्ये अम्फान वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. केकेआरने गुरुवारी एक सहाय्यक वाहन तयार केले आहे. केकेआरची टीम एनजीओसोबत काम करणार असून गरजू सहाय्यक वाहनाच्या माध्यमातून लोकांना मदत पोहचवत आहे.
केकेआरच्या टीमने ऑनलाइन प्रेस कॉन्फरन्स घेत गरजू लोकांपर्यंत मदत कशी पोहचली जाता आहे याची माहिती दिली. यावेळी केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर आणि कर्णधार दिनेश कार्तिक उपस्थित होते.
केकेआर आपल्या सहाय्यक वाहनांच्या माध्यमातून प्रभावित लोकांना वस्तू पुरवण्याचे काम केले जात आहे. उत्तर आणि दक्षिण पश्चिम बंगालमध्ये ही मदत पुरवली जाणार आहे. वादळाचा तडाखा या भागात जास्त बसलेला असून येथील जनजीवन पूर्ण विस्कळीत गेले आहे. केकेआरने त्यांची सुरुवात झोमॅटो फीडिंग इंडिया बरोबर केले आहे.