मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी (२१ एप्रिल) रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मुख्य फलंदाजांना धावा करण्यात अपयश आल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपर किंग्ज संघाने १८ धावांनी विजय मिळवत, गुणतालिकेत ६ गुणांसह पहिला क्रमांक गाठला आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघ पराभवाच्या धक्क्यातून सावरेल इतक्यात त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
या हाय स्कोरिंग सामन्यात पराभव झाल्यानंतर आयपीएलने जरी केलेल्या प्रेस रिलिज मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारावर दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. कारण त्यांच्या संघाने २१ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात स्लो ओवर रेटने गोलंदाजी केली होती. त्यामुळे कोड ऑफ कंडक्ट नुसार कोलकाताचा कर्णधार ईओन मॉर्गनवर १२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
त्यामुळे आता स्लो ओवर रेटमुळे कारवाई करण्यात आलेला मॉर्गन, आयपीएल २०२१ स्पर्धेतील तिसरा कर्णधार तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी देखील स्लो ओवर रेटमुळे मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी यांच्यावर १२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.
दरम्यान, चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद २२० धावा केल्या होत्या. यामध्ये फाफ डू प्लेसिने ४ षटकार आणि ९ चौकार लगावत ९५ धावांची नाबाद खेळी केली होती. तसेच ऋतुराज गायकवाडने ६४ धावांची खेळी केली होती. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, पॅट कमिन्सने ६६ धावांची तुफानी खेळी केली होती. यात त्याने ४ चौकार आणि तब्बल ६ षटकार लगावले होते. तसेच आंद्रे रसलने ५४ आणि दिनेश कार्तिकने ४० धावांची खेळी केला. मात्र या खेळी कोलकाताला विजय मिळवून देण्यासाठी अपुर्या ठरल्या आणि हा सामना चेन्नई संघाने १८ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या:
ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीय खेळाडू आघाडीवर, पाहा कोणाचा आहे टॉप ५ मध्ये समावेश
पॅट कमिन्सने सॅम करनला एकाच षटकात ठोकल्या ३० धावा, गेल-रैना-कोहली यांच्या पंक्तीत मिळवले स्थान
व्हिडिओ : राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूने केली बुमराह, अश्विन आणि भज्जीच्या गोलंदाजीची नक्कल