इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १३ व्या हंगामाची १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये सुरूवात होणार आहे. या आयपीएलहंगामाचे वेळापत्रकदेखील काल (६ सप्टेंबर) प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स म्हणजेच केकेआरचे मार्गदर्शक डेव्हिड हसी(David Hussey) यांनी मोठा दावा केला आहे की, त्यांच्या संघातील अष्टपैलू आंद्रे रसेल(Andre Russel) आयपीएलमध्ये दुहेरी शतक ठोकू शकतो, परंतु त्यासाठी त्याला वरच्या फळीत खेळण्याची आवश्यकता आहे. असे ते म्हणाले
वेस्ट इंडीजचा तुफानी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलची बॅट सध्या सीपीएलमध्ये कडकडाट करीत आहे. आपल्याला आठवत असेल रसेलने आयपीएल २०१९ च्या हंगामात केकेआरसाठी अनेक तुफानी डाव खेळले आहेत. तो फलंदाजीला खालच्या क्रमांकावर येत होता.
परंतु यावेळी संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम(Brandan Macculam) आणि मार्गदर्शक डेव्हिड हसी असा विचार करत आहेत, की धडाकेबाज फटकेबाजी करणारा फलंदाज रसेलला वरच्या क्रमांकावर फलंदाजी साठी पाठवावे ज्यामुळे तो जास्त धावा करू शकेल.
हसी पत्रकार परिषदेत म्हणाले, “जर त्याचा संघाला फायदा झाला आणि आम्हाला क्रिकेट सामना जिंकण्यास मदत झाली, तर का नाही? याचा अर्थ असा की रसेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि तो ६० चेंडू खेळला, तर वास्तवात तो दुहेरी शतक ठोकू शकतो. आंद्रे रसेल काहीही करू शकतो.”
मागील वर्षी रसेलने केवळ १३ डावात ५६.६६ च्या सरासरीने ५१० धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने ११ विकेट्स ही घेतल्या होत्या.
त्याच कामगिरीकडे पाहून हसी म्हणाले की, “तो एक उत्तम खेळाडू आहे, तो संघाती महत्त्वाचा खेळाडू आहे. आम्हाला खरोखरच एक संतुलित संघ मिळाला आहे. कोणताही खेळाडू कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करू शकतो. जर त्याचा संघाला फायदा झाला तर का नाही? तो वरच्या क्रमांकावर फलंदाजी का करू शकत नाही. ”
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोनामुळे क्रिकेटरवर आली वाईट वेळ, चेंडू सापडायला गेला अन्…
टीममधील एक सदस्य सापडला कोरोना पाॅझिटीव्ह, अर्ध्यातच सोडावा लागला क्रिकेटचा सामना
आयपीएलचा उद्धाटनाचा सामना कायमच असतो खास, पहा काय सांगताय आकडेवारी
ट्रेंडिंग लेख –
टीम इंडियात हक्काची जागा न मिळालेला विदर्भाचा धडाकेबाज ढाण्या वाघ
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० धावांचा टप्पा ओलांडणारे ५ क्रिकेटर्स; या भारतीयांचा आहे समावेश
आयपीएलमध्ये पर्पल कॅपचे मानकरी ठरलेले ४ भारतीय गोलंदाज