इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत विजयी सुरुवात करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या झटपट विकेट्स काढण्यात बेंगलोरला यश आले होते. मात्र, कोलकाताच्या शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंग यांनी बेंगलोरच्या गोलंदाजांचा घाम काढत संघाची धावसंख्या दोनशेपार करण्यात मोलाचे योगदान दिले. फलंदाजांव्यतिरिक्त कोलकाताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत बेंगलोरला 81 धावांनी पराभूत केले. हा कोलकाताचा स्पर्धेतील पहिला विजय ठरला.
या सामन्यात नाणेफेक जिंकत बेंगलोरने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 204 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघाला 17.4 षटकात 10 विकेट्स गमावत 123 धावाच करता आल्या. त्यामुळे कोलकाताने हा सामना 81 धावांनी खिशात घातला.
Jeetne aaye hain… Jeet ke jaa rahe hain! 🎶 #KKRvRCB | #AmiKKR | #TATAIPL 2023 pic.twitter.com/qo1T544jtN
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2023
कोलकाताच्या गोलंदाजीपुढे बेंगलोरची फलंदाजी उद्ध्वस्त
कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आल्या. मागच्या सामन्यात चमकलेले विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस कोलकाताविरुद्ध 30 धावांचाही आकडा पार करू शकले नाहीत. यावेळी विराटने 21 धावा, तर फाफने 23 धावाच केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त डेविड विली नाबाद (20), मायकल ब्रेसवेल (19) आणि आकाश दीप (17) यांनाच दोन आकडी धावसंख्या करता आली. त्याच्याव्यतिरिक्त सहा फलंदाज 10 धावाही करू शकले नाहीत.
यावेळी कोलकाताकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्ती (Varun Chakaravarthy) याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. चक्रवर्तीने 3.4 षटकात 15 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या. तसेच, सुयशने 4 षटकात 30 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त सुनील नारायण याने 2 विकेट्स घेतल्या. तसेच, फलंदाजीत चमकलेल्या शार्दुलने गोलंदाजीतही खास कामगिरी केली. शार्दुलने यावेळी 1 विकेट नावावर केली.
शार्दुल आणि रिंकून दिली यशस्वी झुंज
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताकडून शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने अवघ्या 29 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रहमानुल्लाह गुरबाज यानेही संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने यावेळी 44 चेंडूत 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त दोन फलंदाज शून्यावर बाद झाले. तसेच, इतर एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही. मात्र, गुरबाज, शार्दुल आणि रिंकूच्या खेळीमुळे कोलकाताला मोठी धावसंख्या उभारता आली.
यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना डेविड विली आणि कर्ण शर्मा यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्यांनी प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद सिराज, मायकल ब्रेसवेल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले.
या विजयामुळे कोलकाताचा आत्मविश्वास परतला आहे. कोलकाता संघ यापुढील प्रत्येक सामन्यात अशाचप्रकारे विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. (Kolkata Knight Riders won by 81 runs against Royal Challengers Bangalore)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिथं कमी तिथं आम्ही! KKRच्या 89 धावा असताना ‘त्यांनी’ गोलंदाजांना चोपलं, RCBला 205 धावांचं आव्हान
स्टार फलंदाजाला समजली अश्विनची ताकद, कॅरम बॉलने ऑफ स्टंप्स थेट उडवला