आयपीएल 2025 स्पर्धेतील 25 वा सामना आज (11एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळला जाणार आहे. कोलकाता संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच चेन्नईला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चेन्नई संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापती झाल्यामुळे चेन्नईचे प्रतिनिधित्व या हंगामात इथून पुढे महेंद्रसिंग धोनी करताना दिसणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईची खराब अवस्था बदलणार का? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
चेन्नईने या हंगामात पाच सामन्यांमधील चार सामने गमावले आहेत. तसेच दोन सामने त्यांनी त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजे चेपॉकच्या मैदानावर गमावले आहेत. तसेच कोलकाताने देखील मागच्या सामन्यात पराभव पत्करला होता. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन:
चेन्नई: महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रचिन रवींद्र, डेवॉन कॉन्वे, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, आर अश्विन, नूर अहमद, खलील अहमद, अंशूल कंबोज.
कोलकाता: अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डिकॉक, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसल, मोईन अली, रमनदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोडा, वरूण चक्रवर्ती.