पुणे। फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एमएसएलटीए चॅम्पियनशीप सिरीज 12वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात सिद्धार्थ कोंढाळकर, रुद्र मेमाणे, राघव अगरवाल या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट या ठिकाणी आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात सिद्धार्थ कोंढाळकरने सातव्या मानांकित मिहीर काळेचा टायब्रेकमध्ये 9-8(4) असा तर, रुद्र मेमाणेने आठव्या मानांकित शौर्या बोऱ्हाडेचा 9-1 असा पराभव करून आगेकूच केली. पाचव्या मानांकित नीरज जोर्वेकरने आरव मुळ्येचा 9-3 असा पराभव करून अंतिम पात्रता फेरीत प्रवेश केला.
निकाल: दुसरी पात्रता फेरी: मुले:
धीयान पटेल[1] वि.वि.लव परदेशी 9-5;
अझलन शेख[2]वि.वि.अरिन कोटणीस 9-5;
अभिर सिद्धू सिंग वि.वि.विराज सेठ 9-7;
युगंधर शास्त्री[3]वि.वि.अर्णव पांडे 9-1;
राघव अगरवाल वि.वि.देवीत गोसावी[14] 9-2;
नीरज जोर्वेकर[5] वि.वि.आरव मुळ्ये 9-3;
पृथ्वीराज दुधाने[6]वि.वि.प्रत्यूश काळे 9-2;
सिद्धार्थ कोंढाळकर वि.वि.मिहीर काळे[7] 9-8(4);
रुद्र मेमाणे वि.वि.शौर्या बोऱ्हाडे[8] 9-1;
महत्त्वाच्या बातम्या –
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे ३१ मे पासून पुण्यात आयोजन
वनप्लेस करंडक चॅम्पियनशीप सिरीज: पुण्याच्या सृष्टी सूर्यवंशीला दुहेरी मुकुट