भारतातील अनेक राज्य क्रिकेट संघटना आपापली टी२० लीग आयोजित करत असतात. यामध्ये तमिळनाडू प्रीमियर लीग, कर्नाटक प्रीमियर लीग, मुंबई टी२० लीग तसेच नव्याने सुरू झालेल्या आंध्र क्रिकेट लीगचा समावेश आहे. यापैकी सर्वात जुनी लीग असलेली कर्नाटक प्रीमियर लीग तीन वर्षाच्या अवकाशानंतर पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मात्र, यावेळी स्पर्धेची पूर्णपणे नव्याने संरचना केली जाईल.
कर्नाटक प्रीमियर लीग भ्रष्टाचाराच्या कारणामुळे मागील तीन वर्षापासून आयोजित केली जात नव्हती. परंतु, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने पुन्हा एकदा नव्याने स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी स्पर्धेचे नाव महाराजा टी२० ट्रॉफी असे असेल. यामध्ये सहा संघ सहभागी होतील. स्पर्धेवर संपूर्णपणे केएससीएचे नियंत्रण असणार आहे.
भ्रष्टाचार आणि कोरोनामूळे केपीएल बंद करण्यात आली होती. त्यानंतर केएससीएने महाराजा टी२० ट्रॉफी ७ ऑगस्ट ते २७ कालावधीत आयोजित करण्याचे ठरवले आहे. बेंगलोर आणि मैसूर येथे हे सामने खेळले जातील. यामध्ये बेंगलोर, मैसूर, हुबळी, शिवमोगा, रायचूर, मेंगलोर हे संघ दिसतील. खेळाडूंना ए, बी,सी,डी अशा चार गटात विभागले जाईल. भारतीय संघाकडून तसेच आयपीएलमध्ये खेळलेल्या खेळाडूंना ए गटात समाविष्ट करण्यात येईल. तर प्रथमश्रेणी व डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केलेल्यांना बी ग्रुपमध्ये ठेवले जाईल. एकोणीस वर्षाखालील व तेवीस वर्षाखालील कर्नाटकच्या खेळाडूंना सी तसेच उदयोन्मुख खेळाडूंना डी गटात संधी दिली जाईल.
हे खेळाडू दिसू शकतात लीगमध्ये
महाराजा टी२० लीगमध्ये भारतीय संघाकडून खेळलेले बरेच खेळाडू दिसू शकतात. यामध्ये करून नायर, मनीष पांडे, देवदत्त पडिकल, के गौतम यांचा समावेश असेल. प्रसिद्ध कृष्णा भारतीय संघासोबत असल्याने तो यावर्षी खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे. अभिमन्यू मिथुन व स्टुअर्ट बिन्नी हे भारतीय संघाकडून खेळलेले माजी खेळाडू प्रशिक्षक म्हणून दिसू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
शतकवीर मुरली विजयच्या पत्नीची रिऍक्शन पाहण्यासारखी, पोस्ट केलेल्या स्टोरी झाल्या व्हायरल
टी२० विश्वचषकानंतर ‘हे’ ३ भारतीय क्रिकेटर घेऊ शकतात निवृत्ती, एकटा राहिलाय सर्वात मोठा मॅच विनर
कठीण काळात विराटच्या पाठीशी उभा राहिला आझम, कोहलीनेही रिप्लाय करत म्हटले, ‘धन्यवाद’