वेस्ट इंडिज संघ बांग्लादेश दौरा संपवून आता घरच्या मैदानावर श्रीलंकाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळत आहे. त्यानंतर २१ मार्चपासून वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेची सुरुवात होईल. तत्पुर्वी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी वेस्ट इंडिज कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून क्रेग ब्रेथवेट याची निवड केली आहे. बांग्लादेशविरुद्धची त्याची कामगिरी पाहता त्याला हे पद सोपवण्यात आले आहे.
फेब्रुवारी ३ ते १५, या कालावधीत वेस्ट इंडिज विरुद्ध बांग्लादेश यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. ही मालिका वेस्ट इंडिजने २-० ने खिशात घातली होती. यावेळी संघाच्या नेतृत्त्वाची कमान ब्रेथवेटच्या हाती होती. त्याच्यातील नेतृत्त्व कौशल्याला पाहता वेस्ट इंडिज संघ निवडकर्त्यांनी त्याला कसोटी संघाचा नियमित कर्णधार बनवण्याचे ठरवले आहे. यापुर्वी जेसन होल्डर हा वेस्ट इंडिज कसोटी संघाचा कर्णधार होता.
आपल्यावर कायमची संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवल्याबद्दल ब्रेथवेट म्हणाला की, “वेस्ट इंडिज संघाचे कर्णधारपद मिळवणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. बोर्ड आणि निवडकर्त्यांनी मला ही संधी दिल्याचा खूप अभिमान आहे. बांग्लादेशविरुद्ध आम्ही मिळवलेला कसोटी मालिका विजय अतिशय थरारक होता. यानंतर आम्ही घरच्या मैदानावर श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. मला विश्वास आहे की, भविष्यात वेस्ट इंडिज संघ मोठे यश साध्य करू शकतो.”
The 37th men's Test captain of @windiescricket, Kraigg Brathwaite.
Brathwaite has been named the West Indies' new Test skipper, replacing Jason Holder.#MenInMaroon
— ICC (@ICC) March 12, 2021
होल्डरनंतर वेस्ट इंडिज कसोटी संघाचे नेतृत्त्व करणारा ब्रेथवेट हा ३७ वा कर्णधार आहे. यापुर्वी ब्रेथवेटने ७ सामन्यात वेस्ट इंडिजचे नेतृत्त्व केले आहे. २१ मार्च ते २ एप्रिल दरम्यान वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. हे दोन्ही सामने अँटिग्वा येथे खेळवले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तर्क असलेले प्रश्न विचारा’, आर अश्विनला टी२० मध्ये खेळवण्याच्या प्रश्नावर भडकला विराट कोहली