---Advertisement---

‘हे बास का?’ वेस्ट इंडीजच्या कर्णधाराने माजी दिग्गजाला दाखवला बायसेप, जाणून घ्या कारण

Kraigg Brathwaite shows biceps
---Advertisement---

वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला कसोटी विजय माध्यमांमध्ये चर्चाचा विषय आहे. शमार जोसेफ याने रविवारी (28 जानेवारी) दुखापतीतून पुमरागमन करत भेदक गोलंदाजी केली. त्याने घेतलेल्या सात विकेट्सच्या जोरावर वेस्ट इंडीजला मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना जिंकता आला. जोसेफचे हे प्रदर्शन कौतुकास्पद आहेच. पण सामना संपल्यानंतर वेस्ट इंडीजचा कर्णधार क्रेक ब्रेथवेट याची प्रतिक्रिया देखील चर्चेत आहे. ब्रेथवेटने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉडनी हॉग यांनी आपला बायसेप दाखवत निशाणा साधला आहे.

वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा दुसरा कसोटी सामना ब्रिसबेनच्या गाबा मैदानात पार पडला. गुरुवारी (25 जानेवारी) सुरू झालेला सामना रविवारी (28 जानेवारी) म्हणजे चौथ्या दिवशी वेस्ट इंडीजने जिंकला. ऑस्ट्रेलियाला अवघ्या 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 216 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेला ऑस्ट्रेलिया संघ 207 धावांवर सर्वबाद झाला. शमार जोसेफ (Shamar Joseph) याने पदार्पणाची कसोटी मालिका खास बनवली.

गाबा कसोटीतील दुसऱ्या डावात जोसेफने 11.5 षटकांमध्ये 68 धावा खर्च करून 7 विकेट्स नावावर केल्या. या जबरदस्त प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर म्हणून निवडले गेले. विशेष म्हणजे या प्रदर्शनाच्या एक दिवस आधी जोसेफ दुखापतीमुळे मैदानात बाहेर गेला होता. मिचेल स्टार्क याचा घातक यॉर्कर थेट त्याच्या पायाच्या अंगठ्यावर लागला. दुखापतीमुळे त्याला होत असलेल्या वेदना स्टेडियमध्ये सर्वांनी पाहिल्या होत्या. अशात सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याचे शानदान पुरागमन सर्वांसाठी जबरदस्त अनुभव होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर वेस्ट इंडीजने मालिका 1-1 अशा बरोबरीने सोडवली. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर वेस्ट इंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट (Kraigg Brathwaite) म्हणाला, “मी एवढंच सांगेल की, दोन शब्द असे होते, ज्यामुळे आम्हाला सामना जिंकण्याची प्रेरणा मिळाली. मिस्टर रॉडनी हॉग म्हणाले होते की, आम्ही खूप ‘दयनीय’ आणि ‘आशाहीन’ संघ आहोत. हेच शब्द आमच्यासाठी प्रेरणा ठरले. आम्ही दयनीय नाही, हे जगाला दाखवायचे होते. मी रॉडनीला विचारतोय की, हे ठीक आहे का (बायसेब दाखवत)? हे मसल त्यांच्यासाठी पुरेसे आहे.”

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचे विधान ब्रेथवेटसह संपूर्ण वेस्ट इंडीज संघाच्या भावना दुखावणारे ठरले. पण याच विधानामुळे ऑस्ट्रेलियन संघाला गाबा कसोटीत पराभव स्वीकारावा लागला, असे आपण म्हणू शकतो. उभय संघांतील या सामन्याचा एकंदीरत विचार केला, तर पहिल्या डावात वेस्ट इंडीजने 311 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाने 9 बाद 289 धावांवर पहिला डाव घोषित केला. दुसऱ्या डावात वेस्ट इंडीजने 193, तर ऑस्ट्रेलियाने 207 धावा साकारल्या. (Kraigg Brathwaite shows former Australian player Rodney Hogg his biceps)

महत्वाच्या बातम्या – 
WTC । हैदराबदमधील पराभव पडला महागात! अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत फेरबदल
IND vs ENG । दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडचे पारडे झाले जड, महत्वाचा भारतीय खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---