व्यावसायिक क्रिकेटपेक्षा भारतामध्ये टेनिस बॉल क्रिकेट अधिक प्रमाणात खेळले जाते. अगदी लहान गल्लीपासून मोठ्या मैदानांवर टेनिस बॉलचा हा खेळ रंगतो. त्याच टेनिस बॉल क्रिकेटची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चॅम्पियन ट्रॉफी खेळली जाणार आहे. या चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वात मोठा सितारा कृष्णा सातपुते यांच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
भारतीय टेनिस बॉल क्रिकेट मधील सर्वात यशस्वी फलंदाज असलेल्या कृष्णा सातपुते याची चॅम्पियन्स ट्रॉफीसह दुबई येथील प्रसिद्ध सुपर फिक्स या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, यूएई, ओमान, कॅनडा हे देश सामील होणार आहेत. भारत या स्पर्धेचा माजी विजेता असून, मागील वर्षी पाकिस्तानचा पराभव करत भारताने स्पर्धा जिंकलेली. पुन्हा एकदा भारतीय संघाला पाकिस्तानचे कडवे आव्हान या स्पर्धेत असेल.
कृष्णा सातपुते हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी गावचा आहे. आई वडिलांचे कॅन्सरमूळे निधन झाल्यानंतर त्याने क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला हातभार लावला. कृष्णा हा आजवर भारतातील जवळपास सर्वच लहानमोठ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला आहे. तसेच त्याची आखाती देशांमध्ये देखील जबरदस्त क्रेझ दिसून येते. त्याला टेनिस बॉल क्रिकेटचा सचिन तेंडुलकर असे म्हटले जाते. भारताकडून टेनिस बॉल क्रिकेट खेळताना त्याने आत्तापर्यंत २३ शतके ठोकली आहेत. उजव्या हाताने फलंदाजी करणारा कृष्णा हा टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वात महागडा क्रिकेटर मानला जातो. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याला आपला आदर्श मानणारा कृष्णा त्याच्याप्रमाणेच हेलिकॉप्टर शॉट मारण्यात पारंगत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या टी२० स्पेशालिस्टला करायचयं कसोटी संघात पुनरागमन; भारताबद्दल म्हणाला…
‘दीपक हुड्डासोबत प्रॅक्टिस सेशन परवडत नव्हते, तो बॉल थेट…’, प्रशिक्षकांनीच दिले स्पष्टीकरण
मोठी बातमी। सानिया मिर्झाने यूएस ओपनमधून घेतली माघार! पोस्ट करत सांगितले खरे कारण