भारतीय महिला संघ सध्या एकदिवसीय मालिका, टी २० मालिका आणि एक डे नाइट कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. अशात ऑस्ट्रेलिया महिला संघासाठी एक कसोटी आणि ३० एकदिवसीय आणि १८ टी २० सामने खेळलेली माजी फिरकी गोलंदाज क्रिस्टीन बीम्सने एक मागणी केली आहे. बीम्सच्या मते भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेला दोन्ही संघांच्या दिग्गज गोलंदाजांचे नाव दिले पाहिजे.
बीम्सने भारतीची दिग्गज गोलंदाज झूलन गोस्वानी आणि ऑस्ट्रेलियाची दिग्गज गोलंदाज कॅथरीन फिट्जपॅट्रिक यांच्या नावाने मालिकेचे नामकरण करण्याची मागणी केली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांत गोल्ड कोस्टमध्ये टी२० मालिकेला सुरुवात होण्याआधी बीम्सने ही मागणी केली आहे. क्रिस्टीन बीम्स क्रिकेट डॉट कॉमवर बोलत होती, त्यावेळी तीने ही मागणी केली आहे. बीम्स यावेळी बोलताना म्हणाली की, “झूलन गोस्वामी आणि कैथरीन फिट्जपॅट्रिक यांनी क्रिकेटचे तिन्ही प्रकार खेळले आहेत आणि त्यांचे आकडे स्वत: सगळं सिद्ध करतात. खेळात त्यांचा दबदबा राहिला आहे. दोघींनी मिळून ५८० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.”
भारतीय महिला संघाची दिग्गज वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीने २००२ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंती तिने १२ कोसोटी, १९२ एकदिवसीय सामने आणि ६८ टी २० सामने खेळले आहेत. यामध्ये तिने कसोटीत ४४, एकदिवसीयमध्ये २४० आणि टी २० मध्ये ५६ विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच ऑस्ट्रेलियाची दिग्गज कॅथरिनने १९९१ मध्ये क्रिकटमध्ये पदार्पण केले होते. तिने तिच्या कारकिर्दीत १३ कसोटी, १०९ एकदिवसीय आणि दोन टी २० सामने खेळले आहेत. तिने कसोटीमध्ये ६० आणि एकदिवसीय क्रिकटेमध्ये १८० विकेट्स घेतल्या आहेत.
यापूर्वीही अशाच प्रकारची एक मागणी करण्यात आली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची खेळाडू मेल जोसने ट्रॉफीला शांता रंगास्वामी आणि मार्गरेट जेनिंग्स यांचे नाव देण्याची मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
उमरान मलिकचे उत्कृष्ट गोलंदाजीसाठी इरफान पठाणला श्रेय; म्हणाला, ‘त्यानी मला सांगितलं होतं…’
“मला पिवळ्या जर्सीत पाहाल, पण….” पुढीलवर्षी आयपीएलमध्ये खेळण्याबाबत धोनीचे मोठे भाष्य
केवळ शास्त्रीच नाही, तर ‘या’ सदस्याचा देखील टीम इंडियासोबतचा प्रवास टी२० विश्वचषकानंतर संपणार