---Advertisement---

क्रुणाल पंड्याने रचला इतिहास! ठरला आयपीएलमध्ये असं करणारा पहिला खेळाडू

On: बुधवार, जून 4, 2025 2:20 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 चा अंतिम सामना काल (3 जुन) रोजी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (Royal challengers Bangalore vs Punjab king’s) खेळवण्यात आला. आरसीबीने हा सामना 6 धावांनी जिंकला आणि पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरले. यासोबतच पंजाब किंग्जचे पहिले जेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. आरसीबीच्या विजयात स्टार अष्टपैलू क्रुणाल पंड्याने (Krunal pandya) महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात क्रुणालने एक खास कामगिरी केली.

पंजाब किंग्ज विरुद्धच्या अंतिम सामन्यात कृणाल पंड्याने गोलंदाजीचे शानदार प्रदर्शन केले. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने 4 षटकांत फक्त 17 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. कृणालने प्रभसिमरन आणि जोश इंग्लिस यांना आपला शिकार बनवले होते. या दोन्ही विकेट्स आरसीबीसाठी खूप महत्त्वाच्या होत्या. कृणालला त्याच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

आयपीएलच्या इतिहासात अंतिम सामन्यात क्रुणाल पंड्याचा हा दुसरा सामनावीर पुरस्कार होता. यापूर्वी, मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2017 च्या अंतिम सामन्यात क्रुणाल सामनावीर ठरला होता. आता क्रुणाल आयपीएलच्या इतिहासात अंतिम सामन्यात 2 वेळा सामनावीराचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू बनला आहे.

या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 9 गडी गमावून 190 धावा केल्या. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. याशिवाय कर्णधार रजत पाटीदारने 26 धावा, लिव्हिंगस्टोनने 25 धावा, मयंक अग्रवालने 24 धावा आणि जितेश शर्माने 24 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि काइल जेमिसन यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---