कोलकता। रविवार (4 नोव्हेंबर) पासून भारत विरुद्ध विंडीज संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना इडन गार्डन मैदानावर होणार आहे.
या सामन्यासाठी आज (3 नोव्हेंबर) बीसीसीआयने 12 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये पहिल्यांदाच 12 खेळाडूंमध्ये कृणाल पंड्या आणि खलील अहमदला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे कृणाल या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर खलील टी20 पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत.
कृणालचा याआधीही इंग्लंड दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण त्याला अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती.
या 12 जणांच्या संघात रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, रिषभ पंत, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल यांनाही संधी देण्यात आली आहे.
आता या 12 जणांच्या संघामधून अंतिम 11 जणांचा संघ सामन्याच्या आधी कळेल. तसेच भारतीय संघ या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहली आणि एमएस धोनीच्या अनुपस्थितीत खेळणार आहे.
विराट ऐवजी या मालिकेत रोहित शर्मा संघाचे प्रभारी कर्णधारपद सांभाळणार आहे. तसेच पहिल्या सामन्यात रिषभ पंत धोनी ऐवजी यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळताना दिसेल.
असा आहे पहिल्या टी20 साठी 12 जणांचा भारतीय संघ:
रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, रिषभ पंत, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या, खलील अहमद आणि युजवेंद्र चहल.
India's 12 for the 1st T2OI against Windies. #TeamIndia
Rohit Sharma (Captain), Shikhar Dhawan, KL Rahul, Rishabh Pant (wk), Manish Pandey, Dinesh Karthik, Krunal Pandya, Kuldeep Yadav, Bhuvneshwar Kumar, Jasprit Bumrah, Khaleel Ahmed, Yuzvendra Chahal
— BCCI (@BCCI) November 3, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडियाच्या जेवणात बीफ नकोच… पहा कुणी केलीय ही मागणी
–17 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये झाला होता सेहवाग नावाच्या वादळाचा प्रवेश
–फक्त विराट कोहलीच कसोटी क्रिकेटला जिवंत ठेऊ शकतो, दिग्गजाचे रोखठोक मत




