Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भर मैदानात कृणालचं पोलार्डवरील प्रेम गेलं उत्तू, घेतलं मुंबईकराच्या डोक्याचं चुंबन; पाहा Video

भर मैदानात कृणालचं पोलार्डवरील प्रेम गेलं उत्तू, घेतलं मुंबईकराच्या डोक्याचं चुंबन; पाहा Video

April 25, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Krunal-Kisses-Pollard

Photo Courtesy: iplt20.com


आयपीएल २०२२मधील ३७व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सला ३६ धावांनी पराभूत केले. या सामन्यादरम्यान मुंबईकडून कायरन पोलार्ड याला विशेष खेळी करता आली नाही. कृणाल पंड्याने दिपक हुडाच्या हातून त्याला झेलबाद केले. तो १९ धावा करून बाद झाला. मात्र पोलार्ड बाद झाल्यानंतर कृणालने त्याच्यासोबत मजेशीर कृती केली, ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

या सामन्यातील कृणालच्या (Krunal Pnayda) शेवटच्या षटकात पोलार्ड (Kieron Pollard) मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता. परंतु चेंडू जास्त दूर गेला नाही आणि सीमारेषेजवळ दिपक हुडाने त्याचा सोपा झेल झेलला. अशाप्रकारे पोलार्डला बाद केल्यानंतर कृणालला खूपच आनंद झाला आणि त्याने पोलार्डच्या पाठीवर उडी मारत त्याच्या डोक्याचे चुंबन (Krunal Kissed Pollard’s Head) घेतले. 

मात्र पोलार्डने त्यावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. उलट तो अतिशय रागीट चेहरा करून पव्हेलियनला परतला. तत्पूर्वी पोलार्डने पहिल्या डावात कृणालचा १ धावेवर झेल घेतला होता. त्यानंतर पोलार्डने त्याला मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. 

Pollard expression ki , krunal gaadiki moodindhi anukunna….. Just miss u https://t.co/riJhllrJ8w

— Saketh Narayana DHFM (@narayanasaketh) April 25, 2022

A kiss on the head by Krunal Pandya to Kieron Pollard. #LSGvsMI #LSG #MIvsLSG #RohitSharma𓃵 pic.twitter.com/UcsYTig2vh

— chakdecricket (@chakdecricket1) April 24, 2022

सामन्यानंतर पोलार्डसोबत केलेल्या कृतीबद्दल बोलताना कृणाल म्हणाला की, “मी खूप नशीबवान आहे की, मला पोलार्डची विकेट मिळाली. नाहीतर त्याने आयुष्यभर माझे डोके खाल्ले असते की, मी तुला बाद केले आहे. आता १-१ म्हणजे हिशोब बरोबर झाला आहे. तो आता कमीत कमी मला यावरून काही बोलणार तर नाही.”

Scores are even now my brother 🤗 Love you Polly ❤️❤️❤️ @KieronPollard55 pic.twitter.com/XyxUuVqqkG

— Krunal Pandya (@krunalpandya24) April 25, 2022

पोलार्ड आणि कृणाल आहेत चांगले मित्र
कृणाल आणि पोलार्ड यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळत होते. दोघांनी मिळून संघाला बरेच सामने जिंकूनही दिले आहेत. परंतु आयपीएल २०२२साठी मुंबईने पोलार्डला रिटेन केले, तर कृणालला रिलीज केले होते. त्यानंतर लखनऊ संघाने कृणालवर विश्वास दाखवला.

Different teams, but the bond and brotherhood between us remains as strong as ever. Love you Polly ❤️ @KieronPollard55 pic.twitter.com/OT7rSkO9Mp

— Krunal Pandya (@krunalpandya24) April 17, 2022

लखनऊ विरुद्ध मुंबई सामन्यापूर्वी ते दोघे एकत्रही दिसले होते. उभय संघांमध्ये १६ एप्रिलला सामना झाला होता. या सामन्यानंतर कृणालने त्यांचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ते दोघे एकमेकांशी गप्पा मारताना दिसले.

महत्त्वाच्या बातम्या-

पंधरा कोटी पाण्यात घालणाऱ्या इशानविरुद्ध मुंबई इंडियन्स घेणार ‘ऍक्शन’! प्रशिक्षकांकडून संकेत

सामना एक, रेकॉर्ड अनेक! सीएसकेविरुद्ध शिखर धवनचा ‘गब्बर’ पराक्रम, रचले विक्रमांचे मनोरे

हुश्श वाचले! केएल राहुलच्या तेज तर्रार शॉटने फोडलं असतं मुंबईच्या गोलंदाज अन् पंचाचं डोकं- Video


ADVERTISEMENT
Next Post
Rishi-Dhawan

नया है यह! लाईव्ह सामन्यात फेस प्रोटेक्शन घालून रिशी धवनने केली गोलंदाजी, पण का? जाणून घ्या कारण

Dwyane-Bravo

अनुभवी असूनही ब्रावोने २ वेळा क्रिज बाहेर फेकला चेंडू, मग अंपायरनेही दिला जशास तसा निर्णय

Photo Courtesy: Twitter/IPL

बॅकफूटवर असलेल्या सीएसकेला आणखी एक धक्का, 'हा' स्टार अष्टपैलू काही सामन्यांतून बाहेर

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.