बुधवारी (२६ जानेवारी ) वेस्ट इंडिज विरुद्ध (India vs West Indies) होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर काही युवा खेळाडूंना या मालिकेसाठी पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या कृणाल पंड्याला (Krunal Pandya) या मालिकेसाठी देखील भारतीय संघात स्थान देण्यात आले नाहीये. तरीदेखील तो एका खास कारणासाठी चर्चेत आला आहे. काय आहे त्याचे चर्चेत येण्याचे कारण चला जाणून घेऊया.
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या अडचणीत सापडला आहे. त्याचे अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट अज्ञात व्यक्तीने हॅक केले आहे. त्याच्या अकाऊंटवरून एका पाठोपाठ अनेक ट्विट केले गेले आहेत. ज्यामध्ये बिटकॉईनसाठी अकाऊंट विकत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. (Krunal Pandya Twitter account hacked)
या संपूर्ण प्रकरणात क्रूनाल पंड्याने अजुनपर्यंत कुठलीही माहिती दिली नाहीये. त्याचे अकाऊंट हॅक झाल्यानंतर पहिल्यांदा सकाळी ७:३० च्या दरम्यान पहिले ट्विट करण्यात आले होते. असे प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत. हे हॅकर्स प्रसिद्ध लोकांचे अकाऊंट हॅक करत असतात. आता या यादीत कृणाल पंड्याचा देखील समावेश झाला आहे.
कृणाल पंड्याने गेल्या काही वर्षांपासून आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु, आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघाने त्याला रिलीज केले आहे. तसेच हार्दिक पंड्याला देखील मुंबई इंडियन्स संघाने आगामी हंगामासाठी रिलीज केले होते. त्याला अहमदाबाद संघाने आगामी हंगामासाठी रिटेन केले असून,या संघाचे कर्णधारपद देखील दिले आहे.
कृणालच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने भारतीय संघासाठी पाच वनडे सामने आणि १९ टी२० सामने खेळले आहेत. तसेच विजय हजारे ट्रॉफी २०२२ स्पर्धेत तो बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून आला होता.
महत्वाच्या बातम्या :
भारतीय संघातील ३ न्यू कमर्स, ज्यांना मिळू शकते वनडे पदार्पण करण्याची संधी
हे नक्की पाहा: