लीड्स। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील मंगळवारी(17 जुलैला) तिसरा वनडे सामना हेडिंग्ले मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.
त्याने जर या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या तर तो त्याच्या वनडे कारकिर्दीत 50 विकेट घेण्याचा टप्पा पार करेल. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट घेण्याच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अजित आगरकर आणि मिशेल मॅक्क्लेनघनची बरोबरी करेल.
आगरकर आणि मॅक्क्लेनघन यांनी त्यांच्या 23 व्या वनडे सामन्यात 50 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला होता. तसेच वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट घेण्याच्या यादीत श्रीलंकेचा अजंता मेंडीस आहे. त्याने त्याच्या 19 वनडे सामन्यात 50 विकेट घेतल्या होत्या.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात मंगळवारी होणारा वनडे सामना हा कुलदिपचाही 23 वा वनडे सामना आहे. त्याने आत्तापर्यंत 22 वनडे सामन्यात 18.20 च्या सरासरीने 48 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच तो इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाराही गोलंदाज आहे. त्याने या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात मिळून 9 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–म्हणून जोकोविचच्या मुलाला पाहाता आली नाही विंबल्डनची फायनल!
–अजय देवगण आणि तुझे नाते काय? पोलार्डचा कृणाल पंड्याला प्रश्न