रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ चेन्नई येथे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करत आहे. दोन्ही संघांनी मालिकेतील प्रत्येकी एक सामना जिंकल्यानंतर हा सामना निर्णायक ठरणार आहे. मालिका विजयासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या अपयशानंतर सामन्यावर आपली पकड मजबूत केली. फिरकीपटू कुलदीप यादव याने आपल्या शानदार गोलंदाजीचा नजारा पुन्हा एकदा दाखवला. त्याने ऍलेक्स केरी याला बाद करताना टाकलेल्या चेंडूची सध्या चर्चा होताना दिसत आहे.
Bamboozled 💥
An epic delivery from @imkuldeep18 to get Alex Carey out!
Australia 7⃣ down now.
Follow the match ▶️ https://t.co/eNLPoZpSfQ #TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/DCNabrEGON
— BCCI (@BCCI) March 22, 2023
दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांनी नाबाद फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला होता. तसाच खेळ या सामन्यातही त्यांनी दाखवला. हेड-मार्श जोडीने 68 धावांची सलामी दिल्यानंतर मध्यफळीतील फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. ऍलेक्स केरी याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 38 धावांची झुंजार खेळी केली. तो ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे घेऊन जात असताना कुलदीप यादव याने एक ड्रीम बॉल टाकत त्याचा त्रिफळा उडवला.
ऑस्ट्रेलियन डावाच्या 39 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने काहीसा लेग स्टंपवर टाकलेला चेंडू ऑफ स्टंपवर जाऊन आदळला. अनेकांनी या चेंडूला मालिकेतील सर्वोत्तम चेंडू म्हटले. तर, काहींनी हा ड्रीम बॉल असल्याचे सांगितले. कुलदीपने यापूर्वी देखील 2019 वनडे विश्वचषकात पाकिस्तानच्या बाबर अजून याला अशाच चेंडूवर तंबूत पाठवलेले.
पहिल्या दोन सामन्यात अपेक्षित गोलंदाजी करू न शकलेल्या कुलदीपने या सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले. त्याने आपल्या दहा षटकात 1 निर्धाव षटक टाकून 56 धावा देताना, तीन महत्त्वपूर्ण फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
(Kuldeep Yadav Bowl Dream Delivery To Alex Carey In Chennai ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठ महिने आधीच कोच द्रविड यांनी उघड केला टीम इंडियाचा ‘वर्ल्डकप प्लॅन’! म्हणाले, “17-18 खेळाडू…”
तब्बल 6 वर्षांनंतर वनडेत स्मिथच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद, पंड्याने उचलला सिंहाचा वाटा