भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना दिल्ली येथे खेळला गेला. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक ठरला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकवर वर्चस्व गाजवत त्यांना 27.1 षटकात 99 धावांवर सर्वबाद केले. संघाचा अनुभवी चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने चार बळी मिळवत भारतीय आक्रमणाचे नेतृत्व केले. याचसोबत त्याने काही विक्रमांनाही गवसणी घातली.
विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला या सामन्यात गोलंदाजांनी पहिल्यापासून आघाडीवर ठेवले. मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर व शाहबाझ अहमद यांनी 19 षटकात 66 धावांवर दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला होता. 20 व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या कुलदीप यादवने त्यानंतर अक्षरशः एकहाती दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद करण्याची कमाल केली.
4⃣.1⃣ Overs
1⃣ Maiden
1⃣8⃣ Runs
4⃣ WicketsSit back & relive @imkuldeep18's bowling brilliance 🎥 🔽 #TeamIndia | #INDvSA | @mastercardindia https://t.co/rid4SwNkKL
— BCCI (@BCCI) October 11, 2022
त्याने आपल्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर फेकलूकवायोला त्रिफळाचित करत पहिले यश मिळवले. त्यानंतर तिसऱ्या षटकातील तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर त्याने फॉर्चुन व नॉर्किए यांना तंबूचा रस्ता दाखवला. परंतु, त्याची वनडे क्रिकेटमधील आपली दुसरी हॅट्रिक घेण्याची संधी हुकली. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मार्को जेन्सनला आवेश खानकरवी झेलबाद करत त्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला.
त्याने अवघ्या 4.1 षटकात एक निर्धाव षटक टाकत 18 धावा देऊन चार जणांना बाद केले. ही त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही भारतीय गोलंदाजाकडून झालेली ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम सुनील जोशी यांच्या नावे आहे. त्यांनी 6 धावा देत पाच गडी बाद केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: मालिका निर्णायक सामन्यात नाण्याचा कौल भारताच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन
‘ही’ गोष्ट विजय किंवा पराभवाने ठरत नाही, रविचंद्रन अश्विनचे पीसीबी अध्यक्षांना सडेतोड प्रत्युत्तर