सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे सुरु आहे. भारताच्या कुलदीप यादव याने या सामन्यात नेत्रदीपक कामगिरी केली. त्याने पहिल्या सामन्यात 5 गडी बाद केले. चट्टोग्रामच्या मैैदानावर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहेे.
भारतीय संघाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारताने सर्वबाद 404 धावा केल्या. आपल्या पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेला बांगलादेश संघ 150 धावसंख्येवर सर्वबाद झाला. बांगलादेशच्या पहिल्या डावात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) त्यांच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला. त्याने या डावात 16 षटकात 40 धावा देत बांगलादेशच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवले. चट्टोग्रामच्या मैदानावर भारतासाठी एकाच डावात 5 गडी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने मुशफिकूर रहीम (Mushfiqur Rahim), शाकिब अल हसन (Shakib Al Hasan), नुरुल हसन (Nurul Hasan), तैजुल इस्लाम (Taijul Islam) आणि इबादत हुसेन (Ebadot Hossain) या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत बाद केले.
भारत आणि बांगलादेश या संघात चट्टोग्राम येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त असल्याने या सामन्यात भारताचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) याच्या हाती सोपवण्यात आलेे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताच्या डावाची सुरुवात केएल राहुल आणि शुबमन गिल (Shubman Gill) याने केली. राहुल आणि गिल अनुक्रमे 22 आणि 20 धावा करत बाद झाले. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) अवघ्या 1 धाव करत पायचित झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी भारताचा डाव सांभाळला. रिषभ पंत 46 धावा करत बाद झाला तर पुजाराने 90 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या आर अश्विन (R. Ashwin) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी धावफलक चालता ठेवला. अश्विनने या डावात अर्धशतक झळकावले. कुलदीपने फलंदाजीत 40 धावा केल्या तर गोलंदीत 5 गडी बाद केले.(Kuldeep Yadav created history in Chattogram and became first Indian to take five wicket haul on this ground)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BANvIND: कुलदीपच्या ‘पंच’ने बांगलादेशी फलंदाज गडबडले, यजमानांचा पहिला डाव 150वरच आटोपला
बांगलादेशच्या विकेटकीपरने अश्विनला ‘असे’ बाद करून मैदानातच उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल