---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कुलदीप भावुक, चहलने केले सांत्वन

On: शुक्रवार, जून 10, 2022 1:10 PM
Kuldeep-Yadav
---Advertisement---

सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाच टी२० सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार असणाऱ्या केएल राहुल आणि फिरकीपटू कुलदीप यादव दुखापतग्रस्त झाल्याने संघातून बाहेर पडले. तयानंतर आता कुलदीप यादवने इंस्टाग्राम पोस्ट करत संघातून बाहेर झाल्याचे दु:ख प्रकट केले आहे.

कुलदीपने गुरुवारी (९ जून) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर टीम इंडियाच्या जर्सीतील स्वत:चा एक फोटो शेअर करत लिहिले की, “दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्याने निराश झालो आहे. पण मला आशा आहे की संघातील खेळाडू मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करतील. मी त्यांना प्रत्येक प्रकारे साथ देत आहे. मला आशा आहे की मी जोरदार पुनरागमन करू शकेन.”

https://www.instagram.com/p/CelLWYyv0nZ/?utm_source=ig_web_copy_link

टीम इंडियामधील कुलदीपचा सहकारी युजवेंद्र चहलनेही कुलदीपच्या या फोटोवर कमेंट केली आहे. चहलने ‘भावा, लवकरच बरा हो”, असे लिहित कुदीपला शुभेच्छा दिल्या आहेत. चहल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचा भाग आहे. चहल आणि कुलदीप ही जोडी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना आपल्या फिरकीवर नाचयला लावेल, अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती, पण मंगळवारी नेटमध्ये गोलंदाजी करताना कुलदीपच्या हाताला दुखापत झाली आणि त्याला संघातून बाहेर जावे लागले.

कुलदीपने २७ फेब्रुवारी २०२२ रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने २४ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४१ विकेट्स घेतल्या आहेत तर कुलदीपच्या नावावर ६६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०९ बळी आहेत. सात कसोटी सामन्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या या फिरकीपटूने २६ विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, राहुल आणि कुलदीपच्या अनुपस्थितीत भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना गमवावा लागला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इशान किशनने भारतीय संघाकडून सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडने २३ धावांचे योगदान दिले. भारताने दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी २१२ धावांचे लक्ष्य दिले होते, जे आफ्रिकन संघाने ३ गडी गमावून पूर्ण केले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

IND vs SA । पहिला टी२० सामना हरल्यानंतर कर्णधार रिषभ पंतने स्पष्ट केले कारण, म्हणाला…

उमरान मलिकला संघात न घेतल्याने फॅन भडकले टीम इंडियावर; प्रतिक्रीयांचा झाला भडिमार

यजमान संघावर विजय मिळवताच खूष झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने केले मोठे विधान

चेंडू आहे की बंदुकीची गोळी? आवेश खानचा खतरनाक यॉर्कर, डुसेनच्या बॅटचे केले दोन तुकडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---