नेपीयर। भारतीय संघाने आज(23 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवत न्यूझीलंड दौऱ्याची यशस्वी सुरुवात केली आहे.
या सामन्यात भारतासमोर प्रखर सुर्यप्रकाशामुळे डकवर्थ लूईस नियमानुसार 49 षटकात 156 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव या दोघांनी मिळून न्यूझीलंडचा निम्म्यापेक्षा अधिक संघ तंबूत पाठवला. शमीने त्यांच्या सलामीवीरांना बाद करत भारताला चांगली सुरूवात करून दिली होती.
कुलदिपने या सामन्यात 10 षटके टाकताना 39 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे न्यूझीलंड हा सातवा देश ठरला आहे, ज्यांच्याविरुद्ध कुलदीपने तीन किंवा तीन पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
याआधी कुलदिपने विंडीज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि इंग्लंड या संघांविरुद्ध वन-डे सामन्यात तीन किंवा तीन पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत 36 वन-डे सामन्यात खेळताना 73 विकेट्स घेतल्या आहेत.
आजच्या सामन्यात कुलदिप बरोबरच मोहम्मद शमीने 19 धावांत 3, युजवेंद्र चहलने 43 धावांत 2 आणि केदार जाधवने 17 धावांत 1 विकेट्स घेतल्या. त्यामुळे न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करताना 38 षटकात सर्वबाद 157 धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–न्यूझीलंडमध्ये क्रिकेट सामन्यात लख्ख सुर्यप्रकाशामुळे कर्णधाराने खेळाडूला दिला गाॅगल
–बापरे! असेही एक कारण ज्यामुळे टीम इंडियाचा हा विजय आहे खास
–धोनी- कोहलीबद्दल घडला क्रिकेटजगतातील बाप योगयोग