2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात खेळली जाणार आहे. भारतीय संघ मात्र या स्पर्धेतील आपले सामने हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळेल. दरम्यान, भारतीय टीम मॅनेजमेंट आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे.
वास्तविक, भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनं शस्त्रक्रियेनंतर नेट्समध्ये सराव सुरू केला आहे. कुलदीप यादवचे गोलंदाजी करतानाचे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत, या फोटोमध्ये हा फिरकी गोलंदाज नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसतोय.
चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी कुलदीप यादव तंदुरुस्त असणं हे भारतीय संघासाठी खूप शुभ संकेत असतील. वास्तविक, असं मानलं जातं आहे की, भारतीय संघ स्पर्धेतील आपले सामने यूएई किंवा श्रीलंकेत खेळू शकतो. या दोन्ही ठिकाणच्या विकेट्स फिरकीपटूंसाठी अनुकूल मानल्या जातात. त्यामुळे येथे कुलदीप यादव खेळला तर विरोधी फलंदाजांच्या अडचणी वाढणार हे नक्की.
आकडेवारीवरून दिसून येतं की, कसोटी व्यतिरिक्त कुलदीप यादवनं एकदिवसीय आणि टी20 फॉरमॅटमध्येही फिरकी गोलंदाज म्हणून आपली छाप सोडली आहे. त्यानं ‘चायनामन’ गोलंदाजीनं भल्या-भल्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं आहे.
पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं आयोजन करणार आहे. परंतु भारतीय संघ आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळेल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे संघ असतील. अलीकडेच बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात हायब्रीड मॉडेलवर एक करार झाला. आता भारतीय संघ हायब्रिड मॉडेल अंतर्गत आपले सामने संयुक्त अरब अमिराती किंवा श्रीलंकेत खेळणार आहे. यापूर्वी बीसीसीआयनं सुरक्षेच्या कारणास्तव चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता.
हेही वाचा –
याला म्हणतात कमिटमेंट! या भारतीय खेळाडूने दुखापत होऊनही सराव थांबवण्यास नकार दिला
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाचंच वर्चस्व, 14 वर्षांत केवळ इतके पराभव
रोहित शर्मानंतर भारताचा पुढील कर्णधार कोण होणार? धक्कादायक दावा समोर