---Advertisement---

“कुलदीपच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला कर्णधार विराटसह वरिष्ठ खेळाडूंच्या सहकार्याची गरज”

On: शुक्रवार, जून 25, 2021 12:53 AM
Kuldeep-Yadav
---Advertisement---

अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्तिथीमध्ये मर्यादीत षटकांचा भारतीय संघ हा जुलै महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने या दौऱ्यासाठी भारतीय संघ काही दिवसांपूर्वीच जाहीर केला आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी असणार आहे. तर काही खेळाडूंनी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा पण समावेश आहे. याबद्दल कुलदीपचे बालपणीचे प्रशिक्षक कपिल देव पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कपिल देव पांडे यांनी म्हटले आहे, कुलदीपच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी कर्णधार विराट कोहलीसह सर्व ज्येष्ठ खेळाडूंचे सहकार्य त्याला मिळणे आवश्यक आहे.’

कुलदीप यादव भारतीय संघासह श्रीलंका दौर्‍यावर रवाना होणार आहेत. त्याला तेथे नक्कीच चांगली कामगिरी करण्याची इच्छा असेल.

त्याच्या कामगिरी बदल बालपणीचे प्रशिक्षक कपिल देव पांडे म्हणाले की, ‘कुलदीप यादव याला संधी मिळायला हवी आणि त्याला सर्व ज्येष्ठ खेळाडूंच्या सहकार्याची देखील गरज आहे. त्याच्या गोलंदाजीत किंवा फलंदाजीत कोणतीही कमतरता नाही आणि त्याने सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले. पण त्याला विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या ज्येष्ठ खेळाडूंच्या समर्थनाची खूप आवश्यकता आहे.’

टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होण्याची आशा कुलदीप यादवने व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, ‘टी२० क्रिकेटसाठी जर तुम्हाला संघात स्थान हवे असेल तर कामगिरीपेक्षा काहीच फरक पाडणार नाही. श्रीलंका दौऱ्यानंतर आयपीएल आहे, हे सर्व माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल. मला आशा आहे की मी संघात स्थान निर्माण करण्यासाठी चांगली कामगिरी करेन. जर मी दोन्ही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली, तर टी२०विश्वचषक संघात मला स्थान मिळेल.’

कुलदीप यादवची गेल्या काही महिन्यांपासून कामगिरी चांगली राहिली नाही. तसेच त्याला ना भारतीय संघात संधी मिळाल्या आहेत ना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या

आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंड भारताविरुद्धच्या सामन्यात नेहमीच ‘ड्रायव्हिंग सीटवर’, पाहा गेल्या २ दशकातील निकाल

‘टीम इंडिया क्रिकेट विश्वातील नवा चोकर’, चाहत्यांकडून सोशल मीडियावर कडाडून टीका; मीम्सही व्हायरल

ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरल्यानंतर रॉस टेलरला आनंदाश्रू अनावर, मुलाखतीतही खूप रडला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---