---Advertisement---

कुलदीप यादवचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कहर कारनामा

On: शनिवार, ऑक्टोबर 6, 2018 2:52 PM
---Advertisement---

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज मालिकेत विंडीजच्या दुसऱ्या डावात कुलदीप यादवने १४ षटकांत ५४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. याचमुळे विंडीजचा दुसरा डावही पुर्णपणे कोलमडला आहे.

या ५ विकेट्सबरोबर कुलदीप यादवने क्रिकेटच्या तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात डावात ५ विकेट्स घेणारा तो आता ७वा खेळाडू बनला आहे.

भारताकडून अशी कामगिरी केवळ भुवनेश्वर कुमारने केली होती. त्यानंतर आता हा खास विक्रम कुलदीपच्या नावावर जमा झाला आहे.

कुलदीपने वन-डेत ६/२५, टी२०मध्ये ५/२४ तर कसोटीत ५/५७ अशी कामगिरी केली आहे.

कसोटी, वन-डे आणि टी२०मध्ये डावात ५ विकेट्स घेणारे गोलंदाज

टीम साऊदी

लसिथ मलिंगा

अजंता मेंडीस

उमर गुल

भुवनेश्वर कुमार

इम्रान ताहीर

कुलदीप यादव

महत्वाच्या बातम्या-

-टाॅप ५- उद्यापासून सुरु हेत असलेल्या प्रो-कबड्डीमधील मजेशीर आकडेवारी

-पहिल्या कसोटी सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया संघाची घोषणा, तब्बल ३ खेळाडू करणार पदार्पण

वाढदिवस विशेष: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment