पुणे: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित 15व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने सम्मेद शेटेचा पराभव करत 7.5 गुणांनी आघाडी घेतली.
अश्वमेध सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत आठव्या फेरीत सहाव्या मानांकीत महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने महाराष्ट्राच्याच सम्मेद शेटेचा पराभव करत 7.5 गुणांनी आघाडी घेतली. विक्रमादित्यने फ्रेंच डिफेन्स पध्दतीने सुरूवात करत सम्मेदवर 44चालींमध्ये मात केली.
महाराष्ट्राच्या इंद्रजीत महिंद्रकरने रेल्वेच्या आंतरराष्ट्रीय मास्टर रत्नाकरन के याचा पराभव करत 6.5 गुणांसह सणसनाटी निकालाची नोंद केली.
आठव्या फेरीत तामिळनाडूच्या ग्रँडमास्टर सुंदराराजन किदांबी व हरिकृष्णा ए.आरए यांनी सामना 1/2 गुणांसह बरोबरीत राखला व आठव्या फेरीअखेर सुंदराराजनने 6 तर हरिकृष्णाने 6.5 गुण प्राप्त केले.
आंध्रप्रदेशच्या फिमेल मास्टर मट्टा विजय कुमारने ओडिसाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सत्यप्रग्यान स्वयंगसुचा पराभूव करत 6.5 गुणांची कमाई केली. तर सीआरएसबीच्या आंतरराष्ट्रीय मास्टर अभिषेक केळकरने महाराष्ट्राच्या जयंत काटदरेवर मात करत 6.5 गुणांसह आघाडी घेतली.
स्पर्धेचा सविस्तर निकालः आठवी फेरीः(व्हाईट व ब्लॅक या क्रमानुसार):
सम्मेद शेटे(महा)(6.5गुण) पराभूत वि आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(महा)(7.5गुण)
ग्रँडमास्टर सुंदराराजन किदांबी(तामिळनाडू)(6गुण) बरोबरी वि. हरिकृष्णा ए.आरए(तामिळनाडू)(6.5गुण)
आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसु(ओडिसा)(5.5गुण) पराभूत वि एफएम मट्टा विजय कुमार(आंध्रप्रदेश)(6.5गुण)
आयएम रत्नाकरन के (रेल्वे)5.5गुण) पराभूत वि इंद्रजीत महिंद्रकर(महा)(6.5गुण)
आयएम अभिषेक केळकर(सीआरएसबी)(6.5गुण) वि.वि जयंत काटदरे(महा)(5.5गुण)
सिध्दांत गायकवाड(महा)(5.5गुण) पराभूत वि आयएम समीर काठमळे(महा)(6.5गुण)
वेदांत पिंपळखरे(महा)(5गुण) पराभूत वि एजीएम किरण पंडीतराव(सीआरएसबी)(6.5गुण)
ऋत्वीज परब(गोवा)(6गुण)बरोबरी वि. मुथय्या एएल(तामिळनाडू)(6गुण)
दिगंबर जाईल(महा)(6गुण) बरोबरी वि.एफएम सोहन फडके(महा)(6गुण)
श्रयन मुजुमदार(महा)(5गुण) पराभूत वि एफएम अमेय ऑडी(गोवा)(6गुण)
तनिषा बोरामणीकर(महा)(5गुण) पराभूत वि अतुल डहाळे(महा)(6गुण)
वसुधारीणी केसवान(युएसए)(5गुण) पराभूत वि कपिल लोहाना(महा)(6गुण)
ओम लामकाने(महा)(5गुण) पराभूत वि डब्ल्युआयएम चंद्रेयी हजरा(पश्चिम बंगाल)(6गुण)