---Advertisement---

मुलाच्या यशाने बापाची गर्वाने फुगलीय छाती! मुंबईकर पदार्पणवीराच्या वडिलांनी दिलीय लक्षवेधी प्रतिक्रिया, वाचा

On: सोमवार, मे 2, 2022 8:25 PM
kumar-kartikeya
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) अनेक अनकॅप्ड भारतीय क्रिकेटपटूंना त्यांची प्रतिभा दाखवून देण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला आहे. शनिवारी (३० एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२२चा ४४वा सामना झाला. या सामन्यात मुंबईकडून कुमार कार्तिकेय याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. दुखापतग्रस्त मोहम्मद अरसद खानच्या जागी त्याला जागा दिली गेली. आपल्या पदार्पणाच्या आयपीएल सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना त्याने १९ धावा देत १ विकेट्स घेतली. याच कुमार कार्तिकेयच्या वडिलांनी आपल्या मुलाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

कार्तिकेयचे वडिल श्यामनाथ सिंग हे पोलिस हवालदार आहेत. उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूरचे निवासी असलेले श्यामनाथ हे स्वत क्रिकेट या खेळाशी जोडले गेले होते. त्यामुळे त्यांची आपल्या मुलाच्या स्वप्नांचा सन्मान करत त्याला क्रिकेटसाठी प्रोत्साहन दिले. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी स्वतच्या इच्छांना मारून आपल्या मुलाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी बराच संघर्षही केला.

एकवेळ आपल्या मुलाला क्रिकेट किट विकत घेऊन देण्यासाठी पैसे नसल्याने श्यामनाथ यांना लज्जित व्हावे लागले होते. परंतु आता आयपीएलमध्ये पदार्पणात चमकदार कामगिरी करत कार्तिकेयने श्यामनाथ यांनी मान गर्वाने उंच केली आहे. त्याच्या आयपीएलमधील पदार्पणानंतर एसएसपीपासून ते सर्व पोलिस सहकाऱ्यांनी श्यामनाथ यांना शुभेच्छा देत त्यांना सन्मान केला आहे.

आपल्या मुलाबद्दल बोलताना श्यामनाथ म्हणाले की, “माझा मुलगा कार्तिकेय खूप समजदार आहे. त्याला पूर्ण दिवस क्रिकेटच्या मैदानावर मेहनत घेताना पाहून मी त्याच्यासाठी कसलाही अवमान सहन करण्यास तयार आहे. कार्तिकेयचे कष्ट खरे तर एसएन भारद्वाज यांच्यामुळे कमी झाले. त्यांनी कार्तिकेयच्या खेळाचा सर्व खर्च केला. तसेच त्यांनी त्याच्या खेळातील बारीकसारीक गोष्टी त्याला अशाप्रकारे शिकवले की, तो आज कोणत्याही सामन्यात दमदार प्रदर्शन करण्यासाठी तयार आहे.”

तसेच पुढे कार्तिकेयला भारतीय संघाच्या निळ्या जर्सीत पाहण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

सीएसकेची धुरा सांभाळताच धोनीने मोडला द्रविडचा विक्रम; बनला ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला भारतीय

सुपरमॅन बनत रिझवानचा हवेत एकहाती झेल, अद्भुत कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

‘कॅप्टन कूल’ धोनीच्या संयमाचा बांध तुटला, ज्या खेळाडूने सामना जिंकून दिला; त्याच्यावरच भडकला ‘माही’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---