एकीकडे आयपीएलचा तेरावा हंगाम प्ले ऑफच्या दिशेने मजल मारत आहे. मात्र, दूसरीकडे चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सची गाडी डगमगताना दिसत आहे. त्यातही शनिवारी (३१ ऑक्टोबर) दुबईत मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांचा ९ विकेट्सने पराभव झाला. अशात श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याने दिल्लीच्या प्ले ऑफसाठी पात्र ठरण्याच्या अपेक्षांवर शंका व्यक्त केली आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली संघ मागील सलग ३ सामन्यात पराभूत झाला आहे. तसेच, मुंबईविरुद्ध मोठ्या अंतराने सामना गमावल्यामुळे त्यांच्या नेट रन रेटवर मोठा परिणाम झाला आहे. दूसऱ्या बाजूला मुंबईने सर्वाधिक १८ गुणांसह प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. सोबतच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरही १४ गुणांसह गुणतालिकेत दूसऱ्या क्रमांकावर आहे.
दिल्लीच्या फलंदाजीत बिघाड
स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट लाइव्ह’ कार्यक्रमात बोलताना संगकारा म्हणाला की, “मला अचानक दिल्ली संघाची खूप काळजी वाटू लागली आहे. हंगामाच्या सुरुवातीला जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या या संघाची फलंदाजी गेल्या काही सामन्यात बिघडलेली दिसत आहे. त्यांचा संघ पूर्णपणे वरच्या फळीवर निर्भर करतो. वरच्या फळीतील फलंदाजांना सोडले तर संघातील इतर फलंदाज वेगाने धावा करत नाहीत.
बेंगलोर, पंजाब होणार क्वालिफाय
“मुंबईने प्ले ऑफमधील त्यांचे स्थान निश्चित केले आहे. विराटचा बेंगलोर संघही लवकरच क्वालिफाय होईल असे मला वाटते. तसेच, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातही लढत पाहायला मिळेल. मात्र, प्ले ऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ कोणता असेल, याची मला फारशी खात्री नाही. दिल्ली संघ या स्थानासाठी पात्र ठरु शकतो. पण यासाठी दिल्लीला त्यांच्या कमजोरीवर काम करावे लागणार आहे,” असे पुढे बोलताना संगकाराने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त आयपीएल नव्हे तर टी-२०तही मुंबई इंडियन्सचाच गाजावाजा; ‘या’ मोठ्या विक्रमात अव्वल
‘तू आताही बॉसच..’, जोफ्रा आर्चरचा मोठेपणा; गेलचा त्रिफळा उडवूनही केलं मन जिंकणार कृत्य
‘…तर राजस्थानने याआधीच प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं असतं’, माजी दिग्गजाचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
राजस्थानच्या ‘या’ ५ धुरंधरांची दमदार खेळी पडली पथ्यावर; ७ विकेट्सने पंजाब चितपट
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वी ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला