इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा ऍशेस कसोटी सामना मॅंचेस्टरमध्ये खेळला जातोय. शुक्रवारी (21जुलै) म्हणजेच सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंड संघाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. फलंदाजांनी दमदार कामगिरी करत तब्बल 275 धावांची आघाडी मिळवून दिली. यामध्ये संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याच्या नाबाद 99 धावांचा वाटा होता. त्याच्या आक्रमक फलंदाजीने प्रभावी झाल्यानंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याने त्याचे तोंडभरून कौतुक केले.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात इंग्लंडने 4 बाद 384 धावांपासून पुढे केली. संघाची धावसंख्या पहिल्या सत्रानंतर 8 बाद 508 धावा होती, तर दुसऱ्या सत्राआधी त्यांचा डाव 592 धावांवर गुंडाळला गेला. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर जॉनी याने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत तुफानी फलंदाजी केली. त्याने 81 चेंडूमध्ये दहा चौकार व चार षटकारांच्या मदतीने नाबाद 99 धावा केल्या. इंग्लंडचा अखेरचा फलंदाज जेम्स अँडरसन बाद झाल्यामुळे तो आपले शतक पूर्ण करू शकला नाही. त्याच्या या आक्रमक खेळीचे कौतुक करताना संगकारा म्हणाला,
“जॉनी बेअरस्टो हा एक परिपूर्ण फलंदाज आहे. मला तरी वाटते की, सध्याच्या काळात तो तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाजांत येतो.”
जॉनी बेअरस्टो हा सुरुवातीला टी20 स्पेशालिस्ट खेळाडू म्हणून ओळखला जात होता. मात्र, असे असले तरी वनडे व कसोटी संघात सातत्याने योगदान देत आलेला. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 94 कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंड संघाने बॅझबॉल स्टाईल क्रिकेट खेळण्यास सुरुवात करण्यास बेअरस्टो याची फलंदाजी शैली कारणीभूत असल्याचे देखील बोलले जाते.
(Kumar Sangakkara Said Jonny Bairstow Is One Of The Besf Battar In World Right Now)
महत्वाच्या बातम्या –
माजी दिग्गजाचा मोठा दावा! सीएसकेचा पुढचा कर्णधार असेल युवा ‘हा’ खेळाडू
BREAKING: श्रीलंकेच्या विश्वविजेत्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती, वर्ल्डकपआधी घेतला धक्कादायक निर्णय