---Advertisement---

अश्विन महान क्रिकेटर, पण गोलंदाजीत ‘या’ सुधारणेही आहे गरज; कुमार संगकाराचा कडवा सल्ला

On: सोमवार, मे 30, 2022 6:30 PM
R Ashwin
---Advertisement---

राजस्थान रॉयल्सविरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला. राजस्थानकडून या सामन्यात अनुभवी अष्टपैलू आर अश्विन याला लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. त्याने फलंदाजी करताना ९ चेंडूत फक्त ६ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना त्याला आपल्या ३ षटकांच्या स्पेलमध्ये एकही विकेट घेता आली नाही. याउलट त्याने या ३ षटकांमध्ये ३२ धावा खर्च केल्या. यानंतर राजस्थान संघाचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांनी अश्विनला त्याच्या प्रदर्शनात सुधार करण्याचा सल्ला दिला आहे. 

अश्विन (R Ashwin) एक महान क्रिकेटपटू आहे. परंतु त्याला सुधारणेची गरज (Kumar Sangakkara Suggestion To Ashwin) आहे. त्याने पारंपारिक ऑफ ब्रेक गोलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे संगकाराने म्हटले आहे. याबरोबरच अश्विनच्या गुजरात संघासाठीच्या प्रदर्शनाची स्तुतीही त्यांनी केली आहे. 

संगकारा म्हणाले की, “क्रिकेटच्या मैदानावरील त्याचे विक्रम त्याला दिग्गज खेळाडू बनवतात. असे असतानाही त्याला सुधारणेची गरज आहे. खासकरून त्याने ऑफ स्पिन गोलंदाजी करायला पाहिजे. अंतिम सामन्यात त्याने ऑफ ब्रेक गोलंदाजीपेक्षा जास्त कॅरम बॉल टाकले.” 

राजस्थानला करता आल्या नाहीत माफक धावा
पुढे राजस्थानच्या फलंदाजीबद्दल बोलताना संगकारा म्हणाले की, “१३० धावा पुरेशा नव्हत्या. आम्ही नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी निवडायला पाहिजे होती, असा विचारही केला. जेव्हा आम्ही खेळपट्टीवर पोहोचलो तेव्हा खेळपट्टी कोरडी वाटली होती. त्यामुळे आम्हाला वाटले की, खेळपट्टी संथ होईल, ज्यामुळे आमच्या फिरकीपटूंना टर्न मिळेल. आम्हाला १६० ते १६५ धावा करण्याची अपेक्षा होती.”

आयपीएल विजेती टीम क्रिकेटर्सला काय बक्षीस देते? IPL Winning Prize Money | IPL Winners | IPL Trophy

“आम्ही १० षटकात एका विकेटच्या नुकसानावर ७० धावा केल्या होत्या. आम्ही चांगल्या स्थितीत होतो. परंतु संजू सॅमसनला बाद करत गुजरातने आमच्यावर दबाव बनवला. त्यानंतर आम्ही गोलंदाजी करताना पावरप्लेमध्ये काही विकेट्स घेतल्या. परंतु शुबमन गिलला पहिल्या षटकात मिळालेले जीवनदान आमच्यासाठी महागडे ठरले,” असेही संगकाराने म्हटले.

राजस्थान संघाला काही क्षेत्रात सुधारणेची गरज
पुढे राजस्थान संघातील उणीवा सांगताना संगकारा म्हणाले की, “आम्हाला बऱ्याच क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. फलंदाजांविषयी बोलायचे झाले तर, जोस बटलर, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायरने भरपूर धावा केल्या. रियान पगार आणि देवदत्त पडीक्कलने चांगले प्रदर्शन केले, परंतु त्यांनाही अजून योगदान द्यावे लागेल.”

महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

फलंदाजीच्या निर्णयापासून ते ओपनर्सच्या मंद खेळीपर्यंत, ‘या’ ५ कारणांनी केला राजस्थानच्या स्वप्नांचा चुराडा

‘या’ ५ गोष्टींमुळे गुजरात टायटन्सने जिंकली IPL 2022 ची ट्रॉफी, वाचा विजयामागची कारणे

डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एमएसएलटीए चॅम्पियनशीप सिरीज: अभिर सिधु सिंग, पृथ्वीराज दुधाने, रुद्र मेमाणे यांचा मुख्य फेरीत प्रवेश

आयपीएलचे आजपर्यंतचे सर्व विजेते २००८-२०२२ | List of complete IPL winners from 2008-2022 | IPL 2022

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---