भारतीय संघाचा माजी कसोटी कर्णधार अनिल कुंबळे याने 2002 साली एक ऐतिहासिक कसोटी सामना खेळला. संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर असताना कुंबळेने असे काही केले, जे आजही युवा खेळाडूंसाठी प्रेरणा ठरते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कुंबळेचा जबडा तुडला असतानाही त्याने गोलंदाजी केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कुंबळेने या सामन्यावेळी त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया याक होती, याचे उत्तर दिले.
जिओ सिनेमाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनिल कुंबळे () वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्याविषयी बोलत होता. दुखापत झालेली असताना आपण गोलंदाजीसाठी मैदानात जाणार आहोत, हे कुंबळेने पत्नी चेतनाला आधीच सांगितले होते. मात्र, चेतनाचा यावर विश्वास बसला नव्हता आणि कुंबळे मजा घेत आहे, असे तिला वाटले होते. पण नंतर कुंबळे थेट मैदानात उतरला आणि ब्रायन लारा याची महत्वापूर्ण विकेट घेतली.
मुलाखतीत कुंबळे म्हणाला की, “मला इथपर्यंत लक्षात आहे की, प्लेइंग इलेव्हनमध्ये मी एकटा स्पिनर होतो. मलिकेतील पहिले दोन कसोटी सामने मी खेळलो होतो. पहिल्या कसोटीनंतर मला संघातून वगळळे गेले होते. मी दुखापतीनंतर पुनरागमन करत होतो. त्यामुळे संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे, हे मला माहीत होते. आमच्याकडे संधी होती. त्यामुळेच मी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मी माझी पत्नी चेतनाला याविषयी सांगितले.”
कुंबळे पुढे म्हणाला, “मी तिला म्हणालो की, मला माहीत आहे की, मला घरी परतण्याची आणि शस्त्रक्रियेची गरज आहे. पण मी मैदानात जाऊन गोलंदाजी करणार आहे. मला वाटते, त्यावेळी तिला वाटले की, मी मजा घेत आहे. मी पुन्हा ड्रेसिंग रुममध्ये गेलो तेव्हा सचिन तेंडुलकर गोलंदाजी करत होता. तेव्हा मी विचार करत होतो की, आपण जर वेस्ट इंडीजच्या विकेट लवकर घेतल्या, तर जिंकण्याची संधी आहे.”
दरम्यान, भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. सामना अनिर्णित राहिला. तर पाच सामन्यांची ही कसोटी मालिका 2-1 अशा अंतराने यजमान वेस्ट इंडीजने जिंकली. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरला, जो वेस्ट इंडीजने 155 धावांनी जिंकला होता. (Kumble bowled with a broken jaw during the 2002 West Indies tour, revealing his wife’s reaction)
महत्वाच्या बातम्या –
आजच्या दिवशी 49 वर्षांपूर्वी भारताने खेळला होता पहिला वनडे, ‘असा’ लागला होता निकाल
‘तो सामना जिंकल्यावर माझी ओपन जीपमधून मिरवणुक काढली होती, अमिताभ झाल्यासारखं वाटत होतं’