मुंबई | भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे आता नवी इनिंग सुरु करणार आहे. संपुर्ण कारकिर्द गोलंदाज म्हणुन गाजवणारा कुंबळे आता फलंदाजांना मदत करण्यासाठी पुढे येत आहे.
सतत नविन टेक्नाॅलाॅजीची कास धरणारा भारताचा या माजी प्रशिक्षकाच्या कंपनीने आता फलंदाजांसाठी एक खास गोष्ट विकसीत केली आहे.
Spektacom नावाचे एक नविन तंत्रज्ञान अनिल कुंबळेच्या कंपनीने तयार केले आहे. जे दिसायला स्टिकरसारखे असुन बॅटच्या वरच्या भागात लावण्यात येणार आहे. ज्यामुळे फलंदाजाने एखादा फटका किती ताकदीने मारला आहे तसेच त्याला त्याने तो कोणत्या भागातून मारला आहे हे मोबाईल अॅपच्या माध्यमातून समजणार आहे.
याचा वापर देशातंर्गत क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय लीग असलेल्या तामिळानाडू प्रीमियर लीगमध्ये होणार आहे. ही लीग ११ जूलैपासून सुरु होत आहे.
कुंबळेच्या कंपनीचे हे तंत्रज्ञान विकसीत केले असून यापाठीमागे मायक्रोसाॅफ्ट टेकचा मोठा हातभार आहे. ही स्मार्ट चीप जेव्हा बॅटवर बसवली जाईल तेव्हा ती बॅट ‘स्मार्ट बॅट’ म्हणुन ओळखली जाईल, असा दावा भारताकडून एकाच डावात कसोटीत १० विकेट्स घेणाऱ्या या माजी गोलंदाजाने केला आहे.
अनिल कुंबळे हा कायम नव्याची कास धरणारा खेळाडू तसेच प्रशिक्षक म्हणुन ओळखला गेला आहे. भारतीय संघात स्थान पक्के करण्यासाठी फिटनेस महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी यो यो टेस्ट अनिवार्य करा हे सांगणारा कुंबळे पहिला भारतीय प्रशिक्षक होता.
गेले काही दिवस हा महान खेळाडू क्रिकेटपासून दुर होता. परंतु पुन्हा त्याने क्रि्केटसाठी नविन काहीतरी चांगले करण्याचा चंग बांधलाचे यातुन दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–कबड्डीवरुन सेहवाग आणि पाकिस्तानी चाहत्यांचे ट्विटरवर घमासान!
–त्या खेळाडूने वनडेत केलीत ११ शतके परंतु कसोटीत एक सामनाही नशिबात नाही!






