जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सोमणस् हेल्थ क्लबला सांघिक विजेतेपद
पुणे : कुंदन शिशुपाल, मनोज म्हाळसकर, अक्षय बलकवडे यांनी जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत आपापल्या गटातून सुवर्णपदक मिळविले. कै. स्वप्निल जयंत सोमण यांच्या जन्मस्मृतीदिनानिमित्त पुणे जिल्हा अॅमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन सोमणस् हेल्थ क्लबतर्फे करण्यात आले होते. बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशालेत ही स्पर्धा झाली.
या स्पर्धेतील वरिष्ठ पुरुषांच्या ५९ किलो गटात महाराष्ट्र स्पोर्टस् क्लबच्या कुंदन शिशुपाल याने स्कॉटमध्ये ११२.५ किलो, बेंच प्रेसमध्ये ६५ किलो, डेड लिफ्टमध्ये १५० किलो असे एकूण ३२७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. आझम स्पोर्टस् क्लबच्या अलीम शेख याने स्कॉटमध्ये ७० किलो, बेंच प्रेसमध्ये ५० किलो, डेड लिफ्टमध्ये १२५ किलो असे एकूण २४५ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले.
स्पर्धेतील ६६ किलो गटात महाराष्ट्र स्पोर्टस् क्लबच्या मनोज म्हाळसकर याने स्कॉटमध्ये २२० किलो, बेंच प्रेसमध्ये १२२.५ किलो, डेड लिफ्टमध्ये २६० किलो असे एकूण ६०२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. सोमणस् हेल्थ क्लबच्या अजिंक्य जोशी याने एकूण ४२० किलो (१९०-११०-१२०) वजन उचलून रौप्यपदक मिळविले.
स्पर्धेतील ७४ किलो गटात पॉवर हाउसच्या विकास डुमरे याने एकूण ६३५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. फिशर क्लबच्या खलील अन्सारी याने एकूण ६१२.५ किलो वजन उचलून रौप्यपदक, तर सोमणस् हेल्थ क्लबच्या मंदार भुरके याने ४८७.५ किलो वजन उचलून कांस्यपदक मिळविले. स्पर्धेतील ८३ किलो गटात सोमणस् हेल्थ क्लबच्या रोहित डिंबळे याने एकूण ५६५ किलो वजन उचलून सुवर्ण,महाराष्ट्र स्पोर्टस् क्लबच्या आकाश बोंडरे याने एकूण ५३२.५ किलो वजन उचलून रौप्य, तर सोमणस् हेल्थ क्लबच्या क्रि ष्णा थापा याने एकूण ४४० किलो वजन उचलून कांस्यपदक मिळविले. ९३ किलो गटात फिशरच्या गौरव घुले याने (६४५ किलो)सुवर्ण, सोमणस् हेल्थ क्लबच्या धीरज नागणे (५३५ किलो) याने रौप्य तर स्वप्नील बोराडे(४९० किलो) याने कांस्यपदक मिळविले. १०५ किलो गटात भरत अमराळेने (५४२.५ किलो) सुवर्ण, तर प्रणव जगतापने (३५० किलो) रौप्यपदक मिळविले. स्पर्धेतील १२० किलो गटात सोमणस हेल्थ क्लबच्या अक्षय बलकवडे याने एकूण ६७७ किलो वजन उचलून सुवर्णपदकाची कमाई केली. मनोज म्हाळसकर याने स्ट्राँग मॅन किताब पटकाविला. वरिष्ठ गटात सांघिक विजेतेपद सोमणस् हेल्थ क्लबला मिळाले.
*निकाल : सबज्युनियर – ६६ किलो -तौफिक खान (३१२.५ किलो) सुवर्णपदक, सिद्धेश काजोळकर (२८७.५ किलो) रौप्यपदक. ७४ किलो – राहुल शिंदे (४५० किलो) सुवर्णपदक, इंद्रनील वाघ (२८७.५ किलो) रौप्यपदक, राज परदेशी (१९५ किलो) कांस्यपदक.
स्पधेर्चे पारितोषिक वितरण महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई, शाम अकोलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर, गोल्ड जिमचे मोहनीश राजवाडे आणि सोमणस् हेल्थ क्लबचे प्रमुख राजहंस मेहेंदळे यांच्या उपस्थितीत झाले.