fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार सामना; जाणून घ्या सर्वकाही…

September 20, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा दुसरा सामना आज दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला जाईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल.

युएईमध्ये पंजाबचा संघाने अद्यापपर्यंत एकही सामना गमावला नाही. 2014 मध्ये या संघाने सर्व 5 सामने जिंकले. तसेच पंजाबने मागील तीन हंगामातला आपला पहिला सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत संघाला आपला विक्रम कायम ठेवणे आवडेल.

तथापि, यावेळी सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंनी सजलेल्या दिल्ली कॅपिटल्स भारी पडू शकेल. या संघात अनुभवी आर अश्विन, अमित मिश्रा आणि अक्षर पटेलसारखे दिग्गज फिरकीपटू आहेत. धीम्या खेळपट्टीवर त्यांना बरीच मदत मिळणार आहे. दिल्लीही यावेळी प्रथम विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. अश्विन गेल्या वेळी पंजाब संघाचा कर्णधार होता.

युएई मधील दिल्लीचा खराब विक्रम

लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल 2009 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि 2014 च्या हंगामाचे पहिले 20 सामने युएईमध्ये घेण्यात आले होते. त्यावेळी युएईमधील दिल्लीचा रेकॉर्ड खूप खराब होता. त्यावेळी या संघाने येथे 5 पैकी 2 सामने जिंकले आणि 3 गमावले.

या विक्रमांवर असेल नजर

सामन्यात 23 धावा करताच केएल राहुल आयपीएलमध्ये आपले 2 हजार धावा पूर्ण करेल. असे करणारा तो 20 वा भारतीय असेल. ख्रिस गेलने 16 धावा केल्या तर आयपीएल लीगमध्ये 4500 किंवा त्याहून अधिक धावा काढणारा तो दुसरा परदेशी ठरेल. 100 षटकार पूर्ण करण्यासाठी शिखर धवनला 4, तर रीषभ पंतला 6 षटकारांची आवश्यकता आहे.

आमने-सामने – 

आयपीएलमध्ये पंजाब संघाने दिल्लीविरुद्धच सर्वाधिक 14 सामने जिंकले आहेत. आतापर्यंत या दोघांमध्ये 24 सामने खेळले गेले आहेत. दिल्लीने 10 सामने जिंकले आहेत. मागील हंगामात दोघांनी एकेक सामना जिंकला.

खेळपट्टीचा आणि हवामानाचा अहवाल –

दुबईतील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ राहील. तापमान 28 ते 37 डिग्री सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता आहे. खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे स्लो विकेट असल्याने स्पिनर्सनाही खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणार्‍या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल. मागील 61 टी -20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाचा यशाचा दर 55.74% आहे.

 


Previous Post

वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी…

Next Post

लेगस्पिनर ठरली रोहित शर्मासाठी डोकेदुखी; जाणून घ्या काय आहे कारण

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@SunRisers
IPL

MIvSRH: फॉर्मात असलेल्या नटराजनला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण काय? संघ डायरेक्टरनी दिले उत्तर

April 18, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर

April 18, 2021
Next Post

लेगस्पिनर ठरली रोहित शर्मासाठी डोकेदुखी; जाणून घ्या काय आहे कारण

पहिल्याच सामन्यात धोनीचा जलवा; ठोकले दमदार शतक

'मिस्टर आयपीएल' रैनाच्या मोठ्या विक्रमाला धवन घालणार गवसणी, गरज आहे फक्त एका...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.