न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात ३ जानेवारीपासून दुसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या रोमांचक लढतीच्या तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात ३६२ धावांची आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाचा दुसरा डाव १ बाद ८ धावांवर आहे. आबिद अली आणि मोहम्मद अब्बास फलंदाजी करत आहेत. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
न्यूझीलंड क्रिकेट संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर तो व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायल जेमिसन सामन्याच्या पहिल्या दिवशी सामना पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला ऑटोग्राफ (सही) देताना दिसत आहे. विशेष म्हणजे, त्या चाहत्याने पूर्ण टक्कल केली असल्याने जेमिसनने त्याच्या टक्कलवर ऑटोग्राफ दिला आहे. हे पाहून, त्या चाहत्यासह कसोटी सामना पाहायला आलेले इतर क्रिकेटही भलतेच खुश झालेले दिसत आहे.
पुढे सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ दिला आहे. तो चाहता तिसऱ्या दिवशीही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे दिसत आहे. खास बाब म्हणजे, तिसऱ्या दिवशीही त्याच्या डोक्यावर जेमिसनचा ऑटोग्राफ तसाच आहे. फरक एवढाच की, त्या चाहत्याने पहिल्या दिवशी साधारण कपडे घातले होते आणि तिसऱ्या दिवशी मात्र तो सुटाबुटात आलेला दिसत आहे.
Striped singlet to striped blazer but the signature remains for this Kyle Jamieson fan! Sharp spotting from the @sparknzsport team and @sumostevenson #NZvPAK pic.twitter.com/t0ofTugSQC
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 5, 2021
पहिल्या डावात पाच फलंदाजांना धाडले तंबूत
जेमिसनची दुसऱ्या कसोटी सामन्यातील कामगिरी पाहायची झाली तर, त्याने पहिल्या डावात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तावच्या पहिल्या डावात त्याने २१ षटकात ६९ धावा देत ५ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले आहे. यात आबिद अली, हॅरीस सोहेल, फवाद आलम, मोहम्मद रिझवान आणि फहीम अशरफ यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीत शुन्यावर बाद होणं महापाप! ‘या’ तीन आशियायी फलंदाजांनी तर सलग तीन डावात केलंय हे काम
धक्कादायक! आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावू इच्छित होती एक व्यक्ती, भारतीय खेळाडूशी साधला होता संपर्क
वाढदिवस विशेष : परदेशात भारतीय संघाला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारा कर्णधार