ख्राइस्टचर्चच्या हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर बुधावारी (०६ जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने एक डाव आणि १७६ धावांनी विजय मिळवत २-०ने मालिका खिशात घातली आहे. कर्णधार केन विलियम्सन, फलंदाज हेन्री निकोल्स आणि डॅरिएल मिशेल यांच्या अफलातून फलंदाजीचा या विजयात मोठा हातभार लागला. सोबतच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन यानेही आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
या २६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने पाकिस्तानच्या पहिल्या डावात ५ फलंदाजांना तंबूत धाडले. २५ षटकात ६९ धावा देत त्याने हा पराक्रम केला. यात पाकिस्तानचे क्रिकेटपटू आबिद अली, हॅरीस सोहेल, फवाद आलम, कर्णधार मोहम्मद रिझवान आणि फहीम अशरफ यांचा समावेश होता.
तसेच दुसऱ्या डावातही त्याने अवघ्या ४८ धावांत पाकिस्तानचे ६ गडी बाद केले. पाकिस्तानचा सलामीवीर शान मसूद हा त्याच्या दुसऱ्या डावातील पहिला शिकार ठरला. सोबतच त्याने पहिल्या डावातील आबिद अली, हॅरीस सोहेल, कर्णधार मोहम्मद रिझवान आणि फहीम अशरफ यांची दुसऱ्यांदा विकेट घेतली. तसेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटू अझहर अलीलाही त्याने पव्हेलियनला पाठवले.
जेमिसनने केली डॅनियल व्हिटोरीच्या विक्रमाची बरोबरी
अशाप्रकारे एका कसोटी सामन्यातील दोन डावात प्रत्येकी ५ विकेट्स घेत जेमिसनने न्यूझीलंडचे प्रशिक्षक डॅनीयल व्हिटोरी यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. व्हिटोरी यांनी खेळाडू म्हणून खेळताना २००४ मध्ये बांग्लादेशविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात प्रत्येकी ५ विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. त्यांच्यानंतर न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये जेमिसनने हा विक्रम नोंदवला आहे.
Kyle Jamieson is the first New Zealand player to bag 5-wicket hauls in both innings of a Test match since Daniel Vettori in 2004 (vs BAN, Chattogram).
Jamieson is also only the 2nd NZ player to pick a 5-wicket haul in first three series in Test cricket after Jack Cowie. #NZvPAK
— Sampath Bandarupalli (@SampathStats) January 6, 2021
जॅक क्रोनंतर ठरला दुसरा न्यूझीलंडचा खेळाडू
याबरोबरच जेमिसन कारकिर्दीतील पहिल्या तीन कसोटी मालिकेत प्रत्येकी किमान एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा न्यूझीलंडचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत भारत, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळल्या आहेत. या तिन्ही मालिकेत त्याने एकदा तरी एका डावात ५ किंवा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यापुर्वी जॅक क्रो याने हा विक्रम केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
सिडनी कसोटीत रहाणेकडे धोनीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी; करावे लागेल ‘हे’ काम
वसीम जाफरने सोशल मीडियावर ‘हे’ मीम शेअर करत केन विलियम्सनचे केले कौतुक
‘कर्णधार’ रहाणेकडे तब्बल ४३ वर्षांनंतर सिडनीमध्ये ‘अशी’ कामगिरी करण्याची संधी