SA vs AUS WTC Final 2025: 2025च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने आहेत. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आणि ऑस्ट्रेलियाने 67 धावांत 4 विकेट्स गमावल्या. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज काइल वॉरेनने यष्टिरक्षक हेडचा एका हाताने जबरदस्त झेल घेतला. (Kyle Warren makes a brilliant catch of Travis Head)
कागिसो रबाडाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला सुरुवातीचा धक्का दिला, त्यानंतर मार्को जॅन्सनचा कहर पाहायला मिळाला. मार्को जॅन्सनने प्रथम स्टीव्ह स्मिथसोबत 30 धावांची भागीदारी करणाऱ्या मार्नस लाबुशेनला शिकार केली, त्यानंतर त्याने आणखी एक स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडला आपला शिकार बनवले. या विकेटमध्ये विकेटकीपर काइल वॉरेनने महत्त्वाची भूमिका बजावली.
ट्रॅव्हिस हेडने फुल लेग बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटला लागला आणि उजवीकडे उडाला, परंतु यष्टिरक्षक वॉरेनने एक शानदार डाईव्ह घेतली आणि एका हाताने उत्कृष्ट झेल पकडला. त्यामुळे फायनल सामन्यात ट्रॅव्हिस हेड फक्त 11 धावांची खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला.
???? VERREYNNE, WHAT A STUNNER, A GAME CHANGING CATCH ???? pic.twitter.com/DtbanMYvZK
— Johns. (@CricCrazyJohns) June 11, 2025





