फीफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (दि. 18 डिसेंबर) अर्जेंटिना आणि फ्रांस या संघात खेळवला गेला. या चित्तथरारक सामन्यात अर्जेंटिनाने फ्रांसचा पराभव केला. निर्धारित वेळेत सामना 2-2 अशा बरोरित सुटला. त्यानंतर 30 मिनिटांचा अधिकचा वेळ वाढवून देण्यात आला. त्यातही सामना 3-3 अशा बरोबरीत आला. त्यानंतर सामन्याचा निकाल पेनाल्टी शुटआऊटच्या साहाय्याने देण्यात आला. पेनाल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2ने फ्रांसचा पराभव केला. या सामन्यानंतर फ्रांस संघासाठी 3 गोल करणाऱ्या किलियन एम्बाप्पे याला स्पर्धेत सर्वाधिक गोल केल्यामुळे गोल्डन बूट हा पुरस्कार देण्यात आला.
एम्बाप्पेच्या आधी गोल्डन बूटचे मानकरी खालील प्रमाणे
खेळाडूचे नाव- संघ- हंगाम
1. किलियन एम्बाप्पे-2022
2. हॅरी क्रेन- इंग्लंड – 2018
3. जेम्स रॉड्रिगेज- कोलंबिया – 2014
4. थॉमस मुलर- जर्मनी- 2010
5. मिरोस्लॅव क्लोस- जर्मनी- 2006
6. रोनोल्डो- ब्राझील -2002
7. डेवॉर सुकेर – क्रोएशिया- 1998
8. ह्रिस्टो स्टॉईकोव्ह- बल्गेरीया- 1994
9. ओलेग सॅलेंको- रशिया- 1994
10. साल्वाटोर शिलासी- इटली-1990
11. गॅरी लाईनकेर- इंग्लंड- 1986
12. पोउलो रुसी- इटली- 1982
13. मारियो कॅंपेझ- अर्जेंटीना- 1978
14. ग्रेगोर्झ लाटो- पोलंड-1974
15. जेर्ड मूलर- जर्मनी – 1970
16. यूसेबिओ- पोर्तुगाल- 1966
17. लिओनेल सान्शेझ- चिली- 1962
18. ड्रॅझन जर्कोविक- युगोस्लेविया- 1962
19. वावा – ब्राझील- 1962
20. गरिंचा – ब्राझील- 1962
21. वलेंटिन लॅनोव- रशिया- 1962
22. फ्लोरियन अल्बर्ट- फ्रांस- 1962
23. जस्ट फॉन्टेन- फ्रांस- 1958
24.सॅंडर कॉक्सिस- हंगेरी- 1954
25. ऍदेमिर – ब्राझील- 1950
26. लिओनिडास- ब्राझील – 1938
27. ऑल्ड्रिच नेजेड्ली- झेकोस्लोवाकिया- 1934
28.गुलिर्मो स्टेबाइल- अर्जेंटीना-1930
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फीफा विश्वचषकाचे आतापर्यंतचे विजेते, पाहा संपूर्ण यादी
गोष्ट आधुनिक फुटबॉलचा चक्रवर्ती लिओनेल मेस्सीची