रिअल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेचं ‘X’ अकाऊंट हॅक झालं होतं. त्यानंतर या अकाऊंटवरून अनेक वादग्रस्त पोस्ट टाकण्यात आल्या, ज्या व्हायरल झाल्या आहेत.
एमबाप्पेच्या अकाऊंटवरून अचानक विचित्र पोस्ट पाहून लोक आश्चर्यचकित झाले. वादग्रस्त पोस्ट व्यतिरिक्त, त्याच्या हॅक केलेल्या अकाऊंटद्वारे क्रिप्टो चलनाची जाहिरात देखील केली गेली. याशिवाय दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्याशी संबंधित अनेक पोस्ट एमबाप्पेच्या अकाऊंटवर दिसल्या, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.
मात्र थोड्या वेळानंतर एमबाप्पेच्या ‘X’ अकाऊंटवरून सर्व वादग्रस्त पोस्ट हटवण्यात आल्या. यापैकी बऱ्याच पोस्ट क्रिप्टो चलनाबद्दल होत्या, ज्यामुळे कोणाचीही फसवणूक झाली असती. याशिवाय या स्टार फुटबॉलपटूच्या अकाऊंटवरून फ्री पॅलेस्टाईनबाबतच्या काही पोस्ट्सही पाहायला मिळाल्या. या अकाऊंटवरून इस्रायलबाबत बरेच अपशब्द काढण्यात आले. पाहा हॅक झालेल्या अकाऊंटचे ट्विट…
All of Kylian Mbappe’s hacked tweets incase you missed it…
A thread 🧵 pic.twitter.com/4XEpWpnXQA
— george (@StokeyyG2) August 29, 2024
— george (@StokeyyG2) August 29, 2024
— george (@StokeyyG2) August 29, 2024
— george (@StokeyyG2) August 29, 2024
2022 फिफा विश्वचषक विजेता किलियन एमबाप्पे नुकताच स्पॅनिश क्लब रियल माद्रिदमध्ये सामील झाला. तो फ्रेंच क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) सोडून रियल माद्रिदमध्ये दाखल झाला आहे. एमबाप्पे अनेक वर्ष त्याचा बालपणीचा क्लब पीएसजीकडून खेळला. फ्रान्सच्या या स्टार फुटबॉलपटूनं रियल माद्रिदसोबत 5 वर्षांचा करार केला आहे. फुटबॉल चाहत्यांसाठी हा खूप खास क्षण होता, कारण एमबाप्पे रिअल माद्रिदमध्ये सामील होणार असल्याची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. माद्रिदनं एमबाप्पेला 9 क्रमांकाची जर्सी दिली आहे.